Entire administration was present at the Union Minister’s Janata Darbar : निवेदने थेट अधिकाऱ्यांच्या हाती, अख्खे प्रशासन होते हजर
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमात अख्खे प्रशासन हजर होते. त्यामुळे नागरिकांकडून आलेली निवेदने थेट अधिकाऱ्यांच्या हाती देत गडकरींनी ‘ऑन दि स्पॉट’ निकाल लावण्याचे निर्देश दिले. कार्यालयांच्या चकरा मारणे आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उदासीनता सहन करणे, यातून आमची मुक्तता झाली, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात गडकरींना विविध समस्या, अडचणी तसेच मागण्यांशी संबंधित निवेदने लोकांनी दिली. यातील बहुतांश विषय नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदींशी संबंधित होते. यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमाला या सर्व कार्यालयांशी संबंधित प्रतिनिधींना हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी, उपजिल्हाधिकारी (सेतू), समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, भूमि अभिलेख, महानगरपालिका, नासुप्र, सीआरसी सेंटर येथील अधिकारी उपस्थित होते.
Illegal Sand mining : खडकपूर्णात अवैध रेती उपशावर कारवाई, तीन बाेटी उडवल्या
लोकांनी दिलेल्या निवेदनांवर चर्चा करून गडकरींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये थेट फोनवरून संपर्क साधत प्रश्नांचे ‘ऑन दि स्पॉट’ निराकरण करण्यात आले. नागरी सुविधांच्या संदर्भातील मागण्या, शासकीय योजना आदी विषयांशी संबंधित निवेदने नागरिकांनी दिलीत. यावेळी विविध क्रीडा प्रकारांत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे गडकरींनी कौतुक केले. तर काही तरुणांचे विविध क्षेत्रांशी संबंधित इनोव्हेटिव प्रयोग देखील त्यांनी समजून घेतले.
कर्करोग पीडित महिलेने व्यक्त केली कृतज्ञता
कर्करोगाच्या उपचारासाठी सहकार्य केल्याबद्दल एका महिलेने गडकरींचे आभार मानले. ‘मी गेल्या काही वर्षांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खलावली आहे. माझ्या उपचाराकरिता लागणारे औषध अंत्यत महाग आहे. आपल्याला संपर्क साधला असता तातडीने मदत मिळाली. त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे,’ या शब्दांत महिलेने पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली.