Expedite the Work of Futala Musical Fountain : गडकरींचे प्रशासनाला निर्देश, केबल्स खराब होण्यावरून व्यक्त केली नाराजी
Nagpur सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फुटाळा तलावातील फाऊंटेनच्या व बांधकाम प्रकल्पाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिले. त्याचवेळी कोट्यवधी रुपये खर्चून लावलेल्या केबल्स अल्पावधीत खराब झाल्यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, फाउंटेनच्या कलादिग्दर्शक अभिनेत्री रेवती, महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी यांची उपस्थिती होती.
Nitin Gadkari : अडचणींपासून पळू नका, निधड्या छातीने सामना करा
गडकरींनी आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून एक महिन्याच्या आत फाउंटेनच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. काम पुन्हा सुरू करताना नव्याने येणाऱ्या खर्चाचा अंदाज घ्या. काही बाबतीत दुरुस्ती करायची असेल तर तेदेखील तपासून घ्या, अश्याही सूचना गडकरींनी दिल्या. फाउंटेनच्या खराब झालेल्या केबल्सचा पुनर्वापर इतर कुठल्या कामांमध्ये करता येईल का, हे तपासण्याच्या सूचनाही गडकरींनी दिल्या.
Rupali Vs Rupali : राष्ट्रवादीमध्ये दोन “रुपालीं”मधला संघर्ष चांगलाच पेटला
खराब केबल्स तशाच का पडून राहिल्या?
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केबल्स खराब होण्यावरून तर संताप व्यक्त केलाच, शिवाय त्या केबल्स अनेक दिवस तश्याच पडून राहिल्याबद्दलही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. न्यायालयाने फाउंटेनच्या संचालनाला व इतर बांधकामांना स्थगिती दिली होती. परंतु, केबल्स गुंडाळून सुरक्षित ठेवण्याला कुठलीही अडचण नव्हती. यासंदर्भात गडकरींनी नाराजी व्यक्त केली.








