Funds for new bridge at Akola railway station : अकोला रेल्वे स्थानकाच्या नवीन पुलासाठी निधी, विकासप्रकल्पांना गती,
Akola केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात महामार्गांचे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणले. गेल्या दहा वर्षांत देशातील पायाभूत सोयीसुविधांचा कायापालट केला. विशेषतः विदर्भातील रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि त्याला जोडून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. अकोल्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याचीही त्यांना मागणीही खासदारांनी केली आणि गडकरींनी लवकरच कामांना सुरुवात करण्याचा शब्द दिला आहे.
अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नितीन गडकरी यांनी पातुर-शेगाव आणि अकोला-महान या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी तसेच अकोला रेल्वे स्थानकाच्या नवीन पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात त्यांनी संबंधित प्रस्ताव मागवले आहेत, अशी माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.
Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसला केवळ आंदोलनासाठी निळा ध्वज लागतो!
खासदार अनुप धोत्रे यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात भेट घेऊन विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली. गडकरी यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले आणि निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.
यावेळी गांधीग्रामसाठी मंजूर निधीबद्दल खासदार धोत्रे यांनी गडकरींचे आभार मानले. पातुर-शेगाव आणि अकोला-महान रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आणि पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असे स्पष्ट केले.
Ajit Pawar : देशातील ७० टक्के पनीर कृत्रीम, अजित दादा म्हणाले..
गडकरींची घेतली भेट
खासदार धोत्रे यांनी गडकरींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या बाबतीत चर्चा केली. यात काही प्रकल्पांच्या कामाला गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर काही प्रकल्पांची नव्याने मागणी केली. त्यावर गडकरींनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.