Gadchiroli will become an internation steel hubal : गडचिरोली होईल आंतरराष्ट्रीय स्टील हब
Nagpur विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना सिंचनाच्या मुद्याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना त्यांनी अस्तित्वात असलेल्या सिंचन प्रकल्पांचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ‘एखादा प्रकल्प कमी झाला तरी चालेल, पण अस्तित्वात असलेल्या सिंचन प्रकल्पांचा वापर झाला पाहिजे,’ असं गडकरी म्हणाले.
खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत आयोजित ‘अॅडव्हांटेज विदर्भ 2025’चे शुक्रवारी (७ फेब्रुवारी) उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे यांची उपस्थिती होती.
Indian citizenship to Bangladeshi-Rohingyas : बनावट जन्मदाखल्यावरून १३ जणांवर गुन्हे!
सिंचन प्रकल्पांचा 100%वापर व्हावा यासाठी देखील धोरण निश्चिती करावी. आज २२ टक्के सिंचन क्षमत आहे, ती ३२ टक्क्यांपर्यंत गेली पाहिजे. त्यासाठी स्थानिक नेत्यांना जबाबदारी द्यावी, असं निवेदन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी केले.
आगामी पाच वर्षात गडचिरोली हे भारताचे स्टील हब होईल आणि संपूर्ण विश्वात गडचिरोलीतून निर्यात होईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. चंद्रपूर आणि भद्रावती मध्ये ग्रीन स्टील विषय प्रकल्प येत असल्याचे देखील ते म्हणाले. रायपूर ते विशाखापट्टणम 36000 कोटींचा एक्सप्रेस हायवे आपण तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
CM Devendra Fadnavis : ‘अॅडव्हांटेज विदर्भ’मुळे विदर्भ उद्योग क्षेत्राच्या केंद्रस्थानी
गडचिरोलीतून थेट रायपुर-विशाखापट्टणम एक्सप्रेस हायवेला जोडून आपण माल निर्यात करू शकाल. गरज भासल्यास काकीनाडाला देखील घेऊन जाऊ म्हणजे मुंबईला जाण्याची गरज न पडता दळणवळणाचे खर्च कमी होतील, असंही ते म्हणाले.