Nitin Gadkari : गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

Gadkari directly calls Collector for help to the disabled : जनसंपर्क कार्यक्रमात ‘ऑन दि स्पॉट’ निकाल; निवेदनांची गर्दी

Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ऑन दि स्पॉट’ निकालावर भर असतो. रविवारी (दि. १३ एप्रिल) पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. बुलढाण्यातून आलेल्या दिव्यांगांना मदत व्हावी यासाठी गडकरींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. थोड्याच वेळात त्यांचे पत्र, सोबत आलेल्या दिव्यांगांना सोपवण्यात आले. तसेच मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला.

खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी सकाळपासूनच गडकरींना भेटण्यासाठी गर्दी केली होती. कुणी वैयक्तिक तर कुणी प्रशासकीय अडचणींच्या संदर्भात निवेदने दिली. यातच बुलढाण्याहून मतिमंद निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत मिळावी असे निवेदन काहींनी दिले. त्यानंतर गडकरींनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील Collector of Buldhana Dr. Kiran Patil यांना फोन लावला. त्यांना केंद्र सरकारच्या अॅडीप योजनेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे अगदी काही मिनिटांतच गडकरींच्या कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही गेले. त्यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर

नागपुरातील अयोध्यानगर परिसरातील काही नागरिकांनी नाल्याचे पाणी वस्तीत शिरत असल्याचा मुद्दा निवेदनाद्वारे मांडला. यासंदर्भात गडकरींनी त्याच क्षणी मनपा आयुक्तांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली आणि तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. काही नागरिकांनी गेल्या जनसंपर्क कार्यक्रमात दिलेल्या निवेदनावर कार्यवाही झाल्याचे सांगत गडकरींचे आभार मानले.

Food and Civil Supplies Department : अपात्र लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द!

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणीने गडकरींना नोकरीच्या संदर्भात निवेदन दिले. त्यावर तातडीने कार्यवाही करून तिला मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय त्यांनी ऐकून घेतले.