Mahayuti candidates get a boost as Union ministers join the campaign : पश्चिम व उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद, गोरगरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प
Nagpur नितीन गडकरींनी गेल्या दोन दिवसांत तब्बल ११ बैठका आणि सहा जाहीर सभा घेतल्या. शुक्रवारी पहिल्या दिवशी त्यांनी ६ बैठका घेतल्या आणि तीन जाहीर सभा घेतल्या. शनिवारी त्यांनी प्रभाग ७, ९, १७, ३१, ३३ मध्ये बैठकांद्वारे स्थानिकांशी संवाद साधला. तर संध्याकाळी महायुतीच्या उमेदवारांसाठी सलग तीन जाहीर सभा घेतल्या. आज, रविवार, दि. ११ जानेवारीला गडकरींच्या ५ बैठका आणि तीन जाहीर सभा होणार आहेत. गडकरी प्रचाराच्या मैदानात उतरल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना देखील दिलासा मिळाला आहे.
शनिवारी पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक १०, १२, १३ व १४ येथील गिट्टीखदान चौक व हजारी पहाड चौक तर उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक २ येथील म्हाडा कॉलनी येथे गडकरींच्या सभांचे आयोजन करण्यात आले. कांचन बक्सरिया- मसराम, शुभरशनी खोडे-रामटेके, डॉ. वैशाली चोपडे, गिरीश ग्वालबंशी, योगिता तेलंग, माधुरी टेकाम, विनोद कन्हेरे, प्रगती पाटील, दर्शनी धवड, माया ईवनाते, साधना बरडे, विक्रम ग्वालबंशी, योगेश पाचपोर, ऋतिका मसराम, वर्षा चौधरी, विजय होले, डॉ. सरिता माने, अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे आणि पंकज यादव या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभा घेण्यात आल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे, किसन गावंडे, दत्ता खोडे, स्वप्निल खडगी यांची उपस्थिती होती.
Sudhir Mungantiwar : अल्पसंख्याक भागांच्या विकासासाठी मुनगंटीवारांनी दिली गती
गेल्या दोन दशकांमध्ये नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. विशेषतः गेल्या अकरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आणि बरीच कामे सुरू आहेत. रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता प्रत्येक क्षेत्रातील प्रश्न सोडवून गोरगरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे गडकरी म्हणाले.
Danve vs Save मंत्र्यांचा ‘खास माणूस’ कायद्याला भीक घालत नाही
पाणी, रस्ते, स्वच्छता, उद्याने-मैदान आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १९९७ मध्ये ८ पाण्याच्या टाक्या होत्या, आज १०३ आहेत. पूर्वी १८ उद्याने होती, आज २०५ उद्याने आहेत. खेळाची मैदाने ८ होती, आज १२३ आहेत. मात्र, मी या आकडेवारीने समाधानी नाही. नागपुरातील मुलं संध्याकाळी ५ नंतर मैदानावर खेळायला हवी, असा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले.








