Breaking

Nitin Gadkari : दुचाकीवर टोल टॅक्स? काहीही बातम्या देता राव!

News that toll tax will be imposed on two-wheelers is fake : खोडसाळपणावर गडकरींनी व्यक्त केली नाराजी

Nagpur राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहने अजूनही टोलमुक्त आहेत. मात्र, सोशल मीडिया व काही वाहिन्यांवर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनांनाही १५ जुलैपासून टोल भरावा लागेल. हा नियम १५ जुलैपासून लागू होईल, असे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खोडसाळ बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करणे ही पत्रकारिता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार १५ जुलै २०२५पासून सर्व राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल करण्याची योजना आखत आहे, या अफवेचे खंडन गडकरींनी केले आहे. ‘सनसनाटी निर्माण करण्यासाठी सत्यता तपासल्याशिवाय दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी त्याचा निषेध करतो,’ असे गडकरी यांनी म्हटले आहे.

Ration scam : बुलडाण्यात रेशन घोटाळा; नांदुऱ्यात २५० क्विंटल तांदूळ जप्त

सध्या दुचाकी वाहनांच्या मालकांकडून रस्ते कर (रोड टॅक्स) घेतला जात असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केले जात नाहीत. गडकरी यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर पोस्ट करून ‘असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुचाकी वाहनांसाठी टोलवर यापुढेही पूर्णपणे सूट राहील. काही माध्यम संस्था दुचाकी वाहनांवर टोल लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Jayashri Shelke : बुलढाणा विधानसभेतील निवडणूक वैधतेवर वाद!

महिंद्रा लॉजिस्टिक्स प्रस्तुत ‘ईटी एज सप्लाय चेन मॅनेजमेंट फेस्ट २०२५’च्या उद्घाटन सोहळ्यात गडकरींनी भारताच्या कार्यक्षम मालवाहतूक व्यवस्थेसंदर्भात विचार मांडले. कार्यक्षम मालवाहतूक व्यवस्था देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ही व्यवस्था जेवढी अधिक कार्यक्षम असेल, तेवढे भारताचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्त लवकर साकार होईल,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.