Nitin Gadkari ordered nmc, nit officials to remove encroachment in Nagpur city : महापालिका व नासुप्रच्या अधिकाऱ्यांना निर्देश, पालकमंत्री, महापौरांच्या उपस्थितीत आढावा बैठक
Nagpur नागपूर शहरात अनेक जागांवर लोकांनी अतिक्रमण केले आहे. बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. फुटपाथवर दुकाने थाटलेली आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. या सर्वांवर तातडीने कारवाई करून नागपूरला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करा आणि कारवाईचा अहवाल आठ दिवसांत सादर करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार, दि. २९ मार्च) महापालिका व नासुप्रच्या अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील विविध विकासकामे व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गडकरींच्या निवासस्थानी आयोजित बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, राज्यसभा सदस्य माया ईवनाते आदींची उपस्थिती होती.
Ashok kharat case : जामीनासाठी जोरदार युक्तिवाद फेल; अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी
‘नागपूर शहरातील अतिक्रमीत जागांचे सर्वेक्षण करा. या जागांची लीज कुणाकडे आहे, या जागा कुणाच्या ताब्यात आहेत, त्यांचे आरक्षण कोणते आहे, याची माहिती घ्या. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासला हे काम करायचे आहे. पण मनपा आणि नासुप्रच्या सर्वेक्षणाची सत्यता पडताळण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वतंत्र सर्वेक्षण देखील करून घ्या,’ असेही निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. या सर्वेक्षणानंतर कोणत्या जागा खेळाच्या मैदानांसाठी किंवा उद्यानांसाठी आरक्षित आहेत, याची माहिती मिळेल. त्यानुसार मैदाने व उद्याने विकसित करण्यात यावी, असेही गडकरी म्हणाले.
शहरातील पाणी पुरवठा, सर्वांसाठी घरे, शहरात खेळासाठी २०० मैदाने व उद्याने विकसित करणे, शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी बांगलादेश पॅटर्न राबविणे, नाग नदी व पोहरा नदी प्रदूषणमुक्त अभियानाअंतर्गत सुरू भुयारी गडर लाईनची निर्मिती करणे, शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची अंमलबजावणी, केंद्र सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या अमृत १ व अमृत टप्पा २ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, जुना भंडारा रस्त्याचे रुंदीकरण, मौजा चिंचभुवन भागात ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी जागेचे भूसंपादन व सिमेंट रस्त्याची सद्यस्थिती, दलित वस्तीमध्ये सुरू असलेल्या विकास कामाबाबतही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. यासंदर्भात मनपाच्या स्तरावर एक समिती स्थापन करून या जागा निश्चित करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा ‘महाभूकंपा’ची चाहूल !
नागपूर शहरात मनपा व नासुप्रच्या मालकीच्या असलेल्या खुल्या जागेची माहिती यावेळी देण्यात आली. या जागेचा उपयोग भाजी व मटण मार्केट विकसित करण्याच्या संदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मनपा, नासुप्र, नझूलच्या जागांचा एकत्रित विचार करण्यात यावा, अनेकदा रस्त्यावर बाजार भरत असल्याने नागरिकांना त्रास होतो. तसेच वाहतूक विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे ते म्हणाले. या जागांवर फूड मॉल व हॉकर्स झोन निर्माण करण्याच्या संदर्भात त्यांनी निर्देश दिले.
गडकरी म्हणाले, ‘जे ले-आऊट्स महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहेत किंवा प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुन्हा नागपूर सुधार प्रन्यासकडे जाण्याची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था करा.’
Bhujbal on Munde : “मी काही अशोक खरात नाही!” छगन भुजबळांचं मिश्कील उत्तर!
नागनदी प्रदूषण मुक्त कार्यक्रम
केंद्र सरकारकडून नागनदी व पोहरा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी २४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. यासाठी डीपीआर तयार तयार करावा. नाग नदी व पोहरा नदी प्रदूषण मुक्त होऊन शहरातील या दोन्ही नद्या प्रदूषण मुक्त होणार आहे. यासाठी चांगला आराखडा तयार करा, केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. यासाठी तांत्रीक व आर्थिक पात्रता अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ही कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे, यामुळे शहरातील या दोन्ही नद्या स्वच्छ होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच टेक्नीकल व फायनान्शियल क्वालिफिकेशनमध्ये कुठलीही तडजोड करू नका, असेही गडकरींनी कंपनी व मनपाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
चाळीस टक्के गळती कशामुळे?
शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याच्या संदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत, असा त्यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना केला. शहराला पुरेसा पाणी पुरवठा पेंच व कन्हानमधून होत असला तरी चोवीस तास पाणी…







