Breaking

Nitin Gadkari : काम करणाऱ्याचा सन्मान नाही, काम न करणाऱ्याला शिक्षा नाही !

No respect for those who work, no punishment for those who don’t work : ६४व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन

Nagpur मी सरकारच्या विरोधात नाही, पण सरकारची मदत न घेता काम करण्याचा प्रयत्न कलावंतांनी करावा आणि उत्तम यश मिळवावं. एखाद्याने सरकारची मदत घेऊन काम करायचे ठरवले तरी व्यवस्था त्याला नोटीस पाठवते. पुढे गेला तर का गेला? मागे राहिला तर का राहिला? असे नोटीस काढण्यासाठी मंत्रालय तयारच असते. अशाने चांगले काम करण्याचा सन्मान होत नाही आणि जो काम करत नाही त्याला शिक्षा होत नाही, असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. १० जानेवारी) व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात कला प्रदर्शनाचे उद्घाटन गडकरींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘आपल्या देशाला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. या कलेचा विकास करण्यासाठी कलावंतांनी लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून उत्तम कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Nagpur Police : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीचा खून

कला ही जात, धर्म, पंथ असा भेद न मानता समाजातील सशक्त सांस्कृतिक वारसा पुढे नेत असते. कला सतत विकसित होत असते. कलावंतांनी लोकाभिमुख दृष्टिकोनातून उत्तमोत्तम कार्य करून कलेचा हा वारसा पुढे घेऊन जावा. समाजातील उत्तम प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अनेक संस्था करत असतात. अशा संस्थांची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

कलावंतांना संधी व प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या वतीने १९५६ पासून प्रदर्शनाद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामाध्यमातून उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन मिळते, असंही ते म्हणाले. नागपूरनेही अनेक दिग्गज कलावंत, साहित्यिक सांस्कृतिक विश्वाला दिले. नाट्य, संगीत, चित्रकला, साहित्य आदी क्षेत्रांमधील प्रतिभावान मंडळींनी नागपूरचा गौरव वाढवला आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Nagpur Improvement Trust : नागपुरातील शिवसृष्टी प्रकल्प रखडला !

शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूरचे माजी प्राध्यापक नंदकिशोर मानकर यांचा यावेळी ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सात कला प्रकारांत ३१ कलाकृतींना पारितोषिक व ३४ कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनाही प्रोत्साहनार्थ विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले.