Breaking

Nitin Gadkari : सगळे पैसे पोटात आणि वरून आदिवासी विकासाच्या गोष्टी!

 

 

Suggested rating of Ashramshala : आश्रमशाळांचे रेटिंग करण्याच्या नितीन गडकरींच्या सूचना

नागपूर-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) आदिवासी विकास विभागाला Tribal Development चांगलेच सुनावले. निमित्त आदिवासी क्रीडा स्पर्धांचे होते. पण आश्रमशाळांमधील राजकीय हस्तक्षेपावरच त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोट ठेवले. सगळे पैसे आपल्या पोटात घालायचे आणि वरून आदिवासी विकासाच्या गोष्टी करायच्या, याला अर्थ नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

नागपूर Nagpur येथे आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आदिवासी समाजातून संशोधक, डॉक्टर, आयएएस तयार व्हावे, यासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी आश्रमशाळांचे रेटिंग करा. ज्या आश्रमशाळा चांगले काम करत असतील त्यांना कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी मदत करा. मंत्र्यांच्या शिफारसीने आश्रमशाळांची निवड करू नका. चांगलं काम करणाऱ्यांना रेटिंग द्या. बाकीच्यांना सिस्टीममधून बाहेर काढून फेका. शाळा, कॉलेज, आश्रमशाळा आमदार किंवा त्यांच्या सोबतच्या लोकांना वाटू नका. नाहीतर सगळे पैसे आपल्या पोटात घालणार आणि आदिवासी विकासाच्या गोष्टी करणार, याला अर्थ नाही.

Dr. Pankaj Bhoyar : वर्धा जिल्ह्यात सहकाराला बळकटी मिळेल का?

आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करा. त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उभी करा. आदिवासी मुली एअर हॉस्टेस झाल्या पाहिजे. त्यांच्यातून पायलट, दर्जेदार शेफ घडले पाहिजे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्या, अशा सूचनाही गडकरींनी केल्या.

मुख्याध्यापकांनी आमची धुलाई केली

मी शाळेत असताना क्रिकेट खेळायचो. कधीच भाषण स्पर्धेत घेतले नव्हते. पण स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाची स्पर्धा झाली. एक मुलगी भाषण देत होती. तिने ‘नेचर’ शब्दाला ‘नटरू’ म्हटले. त्यानंतर ती अडखळली. आम्ही मागे बसलेल्या मुलांनी ‘पाणी पी… पाणी पी’ म्हणत तिला चिडवले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी आमची धुलाई केली. ‘तिच्यामध्ये डेअरिंग तरी आहे. तुमच्यात तर काहीच नाही,’ असं ते म्हणाले. त्यानंतर मी जिद्दीने भाषण स्पर्धेत भाग घेऊ लागलो. पुढे मला विद्यापीठाचे उत्तम वक्तृत्वासाठी गोल्ड मेडल मिळाले. मुख्याध्यापकांनी मारले नसते तर मी वक्ता झालो नसतो, अशी एक आठवण गडकरींनी सांगितली.