Third Party Monitoring of Solid Waste Treatment Plants : घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांचे ‘थर्ड पार्टी मॉनिटरिंग’
Nagpur भांडेवाडी येथे विविध प्रकल्प सुरू आहेत. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत तयार करणे. बायोसीएनजी तयार करणे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांची माहिती ते सातत्याने आपल्या भाषणांमधून देत असतात. पण कामांची सद्यस्थितीदेखील ते महानगरपालिका आयुक्तांकडून जाणून घेत असतात. त्यामुळे आयुक्तांनी भांडेवाडीला भेट देऊन पाहणी केली आणि थर्ड पार्टी मॉनिटरिंगचे निर्देश दिले.
भांडेवाडी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी या प्रकल्पांची पाहणी केली. तसेच पारदर्शक काम व्हावे, यासाठी थर्ड पार्टी मॉनिटरिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.
येथील प्रकल्पामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे उपलब्ध करा, त्यांच्या जेवणासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करा, सर्व ट्रकला जीपीएस ट्रॅकिंग उपकरणे बसवा, एजन्सीद्वारे सुरू असलेल्या कामावर देखरेख आणि नियंत्रणासाठी ‘थर्ड पार्टी मॉनिटरिंग’ करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
Hair loss due to unknown reasons : तीन गावांमध्ये ‘टक्कल’ पडण्याची साथ !
आयुक्तांनी भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सूसबिडी आणि झिग्मा कंपनीच्या कामाची पाहणी केली. या दरम्यान बायोमायनिंग प्रकल्पाची एजन्सीद्वारे प्रक्रिया केल्यानंतरचे मटेरियल हटविण्यात आले नाही. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली. याशिवाय ‘स्काडा’ आणि जीपीएस ट्रॅकिंगचे ‘ॲक्सेस’ मनपाकडे तत्काळ घेण्यात यावे. तसेच सुसबिडीद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाची गती वाढवावी. असे निर्देश अभिजित चौधरी यांनी दिले.
सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी (सुसबिडी) नवीन कचऱ्यावर प्रक्रिया करते. त्यापासून आरडीएफ, बायो सीएनजी आणि सेंद्रिय खत तयार करते. तर झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्यूशन कंपनी काही मागील वर्षापासून भांडेवाडी येथे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करत आहे. त्यातून निघणाऱ्या वस्तूंची विल्हेवाट लावत आहे. कंपनीतर्फे लावण्यात आलेल्या मिनी प्लांटचीसुद्धा त्यांनी पाहणी केली. येथे कचऱ्यापासून आरडीएफ आणि बायो सीएनजी तसेच सेंद्रिय खत तयार केले जात आहे. आयुक्तांनी सुसबीडीच्या अधिकाऱ्यांना तातडीने नवीन प्लांटची स्थापना करण्याचे निर्देश दिले.