Thousands of devotees reached an appeal of Gadkari : श्री क्षेत्र आदासा येथे अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र आदासा यथे अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नागपूर शहर व इतर भागांमधील साडेचार हजार भाविक स्वखर्चाने आदास्यात दाखल झाले. गडकरी यांच्या एका आवाहनाला सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला प्रतिसाद विशेष चर्चेचा ठरला.
रविवारच्या अतिशय आल्हाददायक पहाटे भाविकांच्या गर्दीने श्री क्षेत्र आदासा बहरले होते. निमित्त होते गडकरींच्या संकल्पनेतून आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे. नागपूर जिल्ह्यातील भाविक अतिशय उत्साहात या उपक्रमामध्ये सहभागी झाले. आणि नितीन गडकरी व कांचन गडकरी तसेच कुटूंबियांसह सर्वांनी अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले.
श्री क्षेत्र आदासा येथील पुरातन गणेश मंदिराचा निसर्गरम्य परिसर अथर्वशीर्षाच्या आवर्तनांनी भारावला होता. अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे सामूहिक पठण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री आशीष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. आशीष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, रमेश मानकर, आदासा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष न्या. राठोड, सचिव जयंत मुलमुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Nitin Gadkari : गडकरींचे Green Signal! अकोला-महान महामार्ग होणार Four lane
आदासा येथे पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची भल्या पहाटेच लगबग सुरू होती. बस व खासगी वाहनांच्या माध्यमातून अनेक भाविक सहकुटुंब आदास्यात दाखल झाले. नागपूरच्या विविध भागांमधून पहाटे पाच वाजता आदासाच्या दिशेने बसेस रवाना झाल्या. त्यामुळे अथर्वशीर्ष पठणाच्या निमित्ताने नागपुरातही पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
Nitin Gadkari in Advantage Vidarbha : विदर्भात साडेसात लाख कोटींची गुंतवणूक
‘प्रणम्य शिरसां देवं’ आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शंखनाद झाला आणि अथर्वशीर्ष पठणाला प्रारंभ झाला. शंतनू बुटी, सचिन काळी, कौस्तुभ पेंडके, राम पांडे, चिन्मय बुटी यांनी व्यासपीठावरून मंत्रोच्चार व अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व केले. आवर्तनांचे पठण सुरू असताना संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गडकरी यांचे संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.