Breaking

No chief officer in Maharashtra : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा स्वराज्यातच अपमान !

Chief Justice of the India Bhushan Gavai is insulted in his own state : दौऱ्यात राज्य शासनातील एकही प्रमुख अधिकारी नाही

Nagpur : भारत देशाचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई हे सरन्यायाधीश बनल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना त्यांचा घोर अपमान करण्यात आला. प्रोटोकॉलनुसार राज्य शासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्यात सहभागी व्हायला पाहिजे. पण या दौऱ्यात त्यांच्यासोबत एकही प्रमुख उपस्थित अधिकारी नव्हता. त्यामुळे सरन्यायाधीशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. या अपमानावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.

राज्यातील एक व्यक्ती जो देशाचा सरन्यायाधीश आहे आणि पहिल्यांदा आपल्या राज्यात येत असताना राज्याचे चीफ सेक्रेटरी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, मुंबई पोलिस कमीशनर यांनी दोऱ्यात उपस्थित राहायला पाहिजे. पण त्यांना येणे योग्य वाटत नसेल तर त्यांनीच विचार करायला पाहिजे. मला बाकी गोष्टींचं काही महत्व नाही. अमरीवतीला जाताना मी पायलट एस्काट नेत नाही. न्यायालयात असतानाही मी मित्रांच्या मोटरसायकलवरून फिरायचो. पण राज्यघटनेच्या संस्थांंपैकी एका प्रमुख संस्थेचा व्यक्ती पहिल्यांदा राज्यात येत असेल तर दिलेली ही वागणूक योग्य आहे की नाही, याचा त्यांनीच विचार करावा. माझ्या जागी दुसरा असता तर कदाचित कलम १४२ चा वापर केला असता. असो.. लहान सहान गोष्टी आहेत. पण उल्लेख यासाठी केला की लोकांना हे कळलं पाहिजे, असे म्हणत भूषण आर. गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Revenue Department : ‘जिवंत सातबारा’तून पाच लाख नोंदी करण्याचा विक्रम !

‘महाराष्ट्राचा सुपूत्र जिद्द आणि चिकाटीने देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पोहोचतो आणि त्याच्याच राज्यात सरकारकडून अपमान होतो, ही अत्यंत वाईट घटना आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि उच्च पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? साधा प्रोटोकॉप पाळता येत नाही? याची जबाबदारी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घेणार का? ही कुणाची चूक आहे’, असे संतप्त सवाल काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी X वर प्रतिक्रिया देऊन केले आहेत.

Gadchiroli Industrial Revolution : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीच्या नावावर लूट !

राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनीही सरकारच्या या बेजबाबदारपणाचा खरपूस समाचार घेतला आहे. X वर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ते लिहीतात, ‘पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले देशाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्या दौऱ्यासाटी राज्य शासनातील एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. न्यायमूर्ती गवई महाराष्ट्राचा अभिमान आहेत. राजशिष्टाचारातील या त्रुटी आणि त्यांचा अपमान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोबत नाही.’