Breaking

North Maharashtra University : महाराष्ट्रात तयार होणार १० हजार सायबर सुरक्षा तज्ज्ञ !

10,000 cyber security experts to be trained in Maharashtra : सरकारी, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणणार

Nagpur : डीजिटल युगातील आव्हानांना सामर्थ्यपणे तोंड देण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात तज्ज्ञ निर्माण करणे आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबवला जाणार आहे. कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, केशव स्मृती जळगाव आणि महा जनशक्ती परिषद या संस्थांच्या माध्यमातून सायबर सुरक्षित महाराष्ट्रासाठी १० हजार सायबर सुरक्षा तज्ज्ञ या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात येणार आहेत.

देशभरात सायबर सिक्युरिटी या महत्वपूर्ण विषयात देशाच्या लोकसंख्येनुसार ५ लाख सायबर एक्सपर्ट्सची आवश्यता आहे आणि आपल्या देशात सद्यस्थितीत ७५ हजारांपेक्षा जास्त सायबर एक्सपर्ट्स उपलब्ध आहेत. देशाची गरज आपले राज्य भरून काढू शकले पाहिजे, यासाठी हा उपक्रम राबवला जातो आहे. सद्यस्थितीत आणि भविष्यातही हा उपक्रम देशासाठी मैलाचा दगड ठरेल, असे सहभागी संस्थांकडून सांगण्यात आले आहे.

Sanjay Khodke : राष्ट्रवादी काँग्रेसने थोपटले रवी राणा विरुद्ध दंड

या उपक्रमात विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, प्रमाणपत्रे आणि पदव्युत्तर डिप्लोमा प्रदान करणे, सायबर सुरक्षा, बॅंकींग सुरक्षा, कृत्रिम बुद्धीमत्ता, डिजिटल मार्केटींग यांसारख्या आधुनिक विषयांचे प्रशिक्षण देणे आणि सरकारी, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे इद्यादी कामे केली जाणार आहेत.

Vidarbha Movement : विदर्भाच्या विकासासाठी ‘समृद्ध विदर्भ’ मोहीम

या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या नावीण्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केल्यास राज्यात सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यास मदत होणार आहे.