Do a caste-wise census of OBC : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन
Amravati ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमरावती शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे यांनी केले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केले.
Minister Sanjay Rathod : शिवजयंतीला तलावांच्या संवर्धनाचा संकल्प
ओबीसींची जातनिहाय जनगणना तातडीने करा. केंद्र सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करून वाढवावी. क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा १५ लाख रुपये करावी. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा. राजकीय आरक्षण वाढवून सर्व ओबीसींना २७% आरक्षण लागू करावे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींचा जातनिहाय सर्वेक्षण करावे. महाज्योतीची विभागीय कार्यालये सुरू करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
ओबीसी विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती द्यावी. ओबीसी, विजा, भज व विमाप्र बेरोजगारांना वैयक्तिक कर्जमर्यादा १५ लाख रुपये करण्यात यावी. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची शिष्यवृत्ती त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रियेमुळे ओबीसींचे आरक्षण शून्य झाले आहे, ते पूर्ववत सुरू करावे, या मागण्यांचा देखील यात समावेश आहे.
Delhi Sahitya Sammelan : साहित्य परिषदेची घटना साकारणारे अकोल्याचे साहित्य संमेलन !
या आंदोलनात अजिज पटेल, रितेश हेलोंडे, शेखर अवघड, राहुल तायडे, प्रवीण वानखडे, अरुणा फरकाडे, सविता बोबडे, राजेंद्र निकम, पुरुषोत्तम पटोडे, सूरज धरमे, दिवाकर सगणे, योगेश बोबडे, सतीश तुळे यांच्यासह शेकडो ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.