OBC Community’s Battle : सरकारने काहीही उत्तर दिले तरी ओबीसींचा मोर्चा निघणारच !

OBC Rally Will Proceed Regardless of Govt’s Response said Congress Leader Vijay Wadettiwar : ‘त्या’ जीआरमुळे ओबीसींचे नुकसान, नोकऱ्याच शिललक राहणार नाहीत

Nagpur : १० ऑक्टोबरला आम्ही ओबीसींचा मोर्चा काढणार आहोत. हे बघून मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात उद्याच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. सरकारने २ सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द करावा, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांचीही हीच मागणी आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले तरीही आमचा १० ऑक्टोबरचा मोर्चा निघणारच आहे, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात नागपुरात आज (३ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारने २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याचा निर्णय जरी घेतला तरी १० ऑक्टोबरला नागपुरात निघणाऱ्या मोर्चामध्ये सरकारच्या प्रतिनिधींनी तशी माहिती द्यावी. कारण मोर्चा निघावा ही ओबीसी बांधवांची भावना आहे. तो जीआर ओबीसींचे वाटेकरी वाढवणारा आणि त्यांचे जीवन उद्धवस्त करणार आहे, अशीही आमच्या बांधवांची भावना झाली आहे. या जीआरमुळे नोकऱ्या शिल्लक राहणार नाहीत. परिणामी ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे तो जीआर रद्द करावा, अशी आमची मागणी आहे.

Chandrashekhar Bawankule : भाजपवर बोलल्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही !

आम्ही वर्गणी गोळा करून या मोर्चासाठी गाड्या ठरवल्या आहेत. त्यामुळे मोर्चा निघणारच आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ४० प्रतिनिधी उपस्थित राहतील. ४० ओबीसी नेत्यांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाला दिली आहे. त्या सगळ्यांना बोलावून समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केलेली आहे. उद्या (४ ऑक्टोबर) ओबीसींच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तरीही मोर्चा निघणारच आहे. सरकारने आमच्या मागणीसंदर्भात काय केले, हे सरकारच्या प्रतिनिधींनी मोर्चासमोर येऊन सांगावे, तेव्हा कुठे ओबीसी समाज शांत होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.