Congress MLA Abhijit Wanjarri Demands Meeting of 400 Community Leaders : ४०० जातींच्या प्रमुखांना बोलावून बैठक घ्यावी
Nagpur : मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. पण त्यानंतर ओबीसी संघटनांनी आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष सुरू केला आहे. २ सप्टेंबरच्या जीआर विरोधात वकीलांचा अभ्यास सुरू आहे. यासंदर्भात लवकरात लवकर याचिका दाखल होऊ शकते. अमरावती आणि नागपूर विभागांतील सर्व जिल्ह्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. लवकरच आम्ही महामोर्चा काढण्याची तयारी करत आहो, असे काँग्रेस नेते आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले.
यासंदर्भात आमदार वंजारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसी प्रवर्गामध्ये ४०० जाती आहेत. या सर्व जातींच्या प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सह्याद्रीवर बोलावून मिटींग घ्यावी. हैद्राबाद गॅझेट कशा पद्धतीने ओबीसींसाठी घातक नाही, हे सरकारने स्पष्ट करून सांगावे. आमच्या आरक्षणावर अतिक्रमण कशा पद्धतीने होत नाहीये, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट करून सांगावे. ओबीसी बांधवांचे समाधान झाले, तर आम्ही पुढचा विचार करू.
OBC reservation : तरुणांचं मनोधैर्य वाढवा, गोंधळ पसरवू नका !
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये बैठका होणार आहेत. १९ सप्टेंबरला सामाजिक संघटना आणि समाज स्तरावरच्या सर्व संघटना एकत्र येणार आहेत. त्या सर्वांना नागपुरात बोलावून आम्ही बैठक घेणार आहोत. ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींच्या प्रमुखांना आमंत्रित करून २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे आमदार वंजारी म्हणाले.
Maharashtra politics : अजितदादांवर पुन्हा बोललात तर जीभ हासडू !
आता बंजारा, समाज आणि धोबी समाजाकडूनही मागणी पुढे आली आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रवर्गांत प्रावधान होते. आता त्यांच्या मागणीवर सरकार पुढाकार घेऊन, सर्व जातींच्या प्रमुखांना बोलावून ‘दुध का दुध अन् पानी का पानी’ करणार का, असा सवाल आमदार वंजारी यांनी केला. हैद्राबाद गॅझेट मराठा समाजाच्या मागणीबाबत केवळ नोंदणी शोधण्यापुरता मर्यादित न ठेवता इतर समाजांच्या ज्या मागण्या आहेत, वेगवेगळ प्रवर्ग आहेत, ते लागू करणार का, असाही प्रश्न सर्वांच्या मनात असल्याचे ते म्हणाले.