OBC Reservation : आमरण उपोषण सुरूच राहणार, पाठिंब्याच्या पत्रांचा ओघ

Decision to continue the indefinite hunger strike : माजी आमदारांच्या घरी झाली बैठक, आंदोलनाची दिशा ठरली

Akola राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसखोरीची दारे उघडली असून हा प्रकार अन्यायकारक असल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार, १५ सप्टेंबरपासून पाच प्रतिनिधींनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांमध्ये जनार्दन हिरळकर, शंकर बापूराव पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, ऍड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशिकर व राजेश माणिकराव ढोमणे यांचा समावेश आहे. यापैकी ढोमणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित चौघांनी हे आंदोलन अखंडित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Manikrao Kokate : मिटकरी माझे ‘गुरु’, बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात

दरम्यान, ओबीसी समाजाच्या विविध घटकांमधून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून गावोगावातून पाठिंब्याची पत्रे आंदोलन समितीकडे येत आहेत.

ओबीसी समाजातील ओतारी, डोबारी, छप्परबंद मुस्लिम, माकडवाले, लभाणी, वेरड, रामोशी, मुस्लिम शहा, मुस्लिम मदारी, मन्नेवार, बागवान आदी समाजघटकांच्या प्रतिनिधींनी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलन शासन दरबारी पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी माजी आमदार हरिदास भदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपोषण अखंडित सुरू ठेवण्याचा निर्णय पक्का करण्यात आला. गावोगावून मिळत असलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

Orphans policy : महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील अनाथ युवकांसाठी धोरण ठरवा

या बैठकीत माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायण गव्हाणकर, प्रा. डॉ. संतोष हुशे, विजय कौशल, अमोल पाथरकार, आत्माराम म्हात्रे, परशराम बंड, श्रीकांत ढगेकर, संतोष सरोदे, गोविंद इंगोले, सुभाष सातवंसह अनेकांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करण्याचे ठरवले.