OBC reservation : उपोषण सोडले, पण मुंबई बंदचा इशारा!

Demand to cancel the GR granting Kunbi certificates to Marathas : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र जीआर रद्द करण्याची ओबीसींची मागणी, १० ऑक्टोबरला नागपूरमध्ये महामोर्चा

Amravati मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राज्य शासनाचा २ सप्टेंबर रोजीचा ‘जीआर’ हा मूळ ओबीसी समाजाचे भवितव्य अंधकारमय करणारा आहे. हा जीआर म्हणजे ओबीसींना उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र असून, तो आमच्या नरडीचा घोट घेणारा ठरणार आहे. त्यामुळे तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाने केली आहे. या मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी नागपूर येथे महामोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतरही सरकारने निर्णय न घेतल्यास भविष्यात मुंबई बंद पाडू, असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी रविवारी अमरावतीत दिला.

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या दबावामुळे शासनाने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. त्याच्या विरोधात ओबीसी जनमोर्चाचे जिल्हा संघटक तुषार वाढोणकर व प्रमुख पदाधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी २४ सप्टेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. रविवारी पाचव्या दिवशी प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडवण्यात आले.

Vidarbha State : नागपूर कराराची होळी, पुन्हा वेगळ्या विदर्भाची मागणी

दरम्यान, या उपोषणाला राज्यातील अनेक नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. खासदार बळवंत वानखडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदारांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधितांच्या मागण्या ऐकून घेतल्या.