OBC Reservation : ओबीसींची व्युहरचना ठरली, दोन स्तरांवर लढणार आरक्षणाची लढाई !

OBCs Finalize Strategy, to Fight Reservation Battle on Two Fronts : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, हक्कांचे संरक्षण व्हावे

Nagpur : मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने नवा शासन निर्णय काढून अन्याय केल्याची भावना ओबीसी समाजाची झाली आहे. या अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी आज (६ सप्टेंबर) नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत लढ्याची व्युहरचना ठरवण्यात आली. ओबीसी आता दोन स्तरांवर आरक्षणाची लढाई लढणार आहेत, असे ओबीसी नेते आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आज ओबीसींसाठी लढताना आर्थिक चणचण जाणवते. पण नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपसुकच दूर होईल. ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयान लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे.

Modi on Trump : राष्ट्राध्यक्षांच्या भावनांबद्दल ‘तहे दिल से सराहना करते हैं’

नागपुरात येत्या १२ सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर शासन निर्णयावील लढाईच्या अनुषंगाने पुढील व्युहरचना निश्चित करण्यात येईल. मात्र दोन स्तरांवर लढाई लढण्याचे आम्ही आजच्या बैठकीत ठरवले आहे. पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे. विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यांना सर्व ओबीस संघटनांचा पाठिंबा असेल.

Vijay Wadettiwar : नव्या शासन निर्णयातून ओबीसींचे नुकसान, नागपुरात निघणार महामोर्चा !

दुसरा लढा आंदोलनांच्या माध्यमातून लढला जाईल. कुणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. सोबत आमच्या हक्कांचे संरक्षण होणेही आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमची भूमिका आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.