OBC Vs Maratha : ओबीसीसाठीही मंत्रिमंडळाची स्वतंत्र उपसमिती

Maratha community is happy, discontent in the OBC community : मराठा समाज आनंदी, तर ओबीसी समाजात नाराजीचा सूर

Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून जीआर काढल्यानंतर एकीकडे मराठा समाज आनंदी झाला असला, तरी दुसरीकडे ओबीसी समाजात नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. ओबीसींच्या या नाराजीला शांत करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ओबीसी समाजासाठी देखील मंत्रिमंडळाची स्वतंत्र उपसमिती स्थापन करण्याचे ठरले आहे. याबाबतचा जीआर जारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांची देवगिरी निवासस्थानी तातडीची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा करण्यात आली.

Reservation controversy : मराठा आरक्षणाच्या जीआरवरून वाद

भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं की, कुठल्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही. हा जीआर ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा आहे.”

ओबीसी समाजाची नाराजी लक्षात घेऊन शासनाने आजच महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ओबीसींसाठी ६ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक पक्षातील दोन सदस्य या समितीत असतील. आजच या संदर्भात जीआर निघणार आहे. सरकारच्या या पावलामुळे ओबीसी समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे.

Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सदावर्ते आक्रमक

 

दरम्यान, जालना जिल्ह्यात आणि भोकर येथे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरची प्रत ओबीसी बांधवांनी फाडून पायदळी तुडवली. तर भोकरमध्ये तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी जीआरची प्रत जाळून होळी केली. ओबीसी समाजाचा आरोप आहे की, “मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गात घुसखोरी सुरू आहे. जीआर रद्द झाला नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील.”

_____