OBCs Vow to Protect Reservation : ओबीसी संघटनांचा १० ऑक्टोबर रोजी महामोर्चा

Vidarbha OBC Groups to Launch Mega Morcha in Nagpur on October 10 : नागपुरात निघणार विदर्भातील महामोर्चा

Nagpur : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शासन निर्णयामध्ये आधी पात्र शब्द होता तो वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला तो ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा आहे. या विरोधात विदर्भातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा नागपुरात महामोर्चा निघणार, अशी घोषणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विदर्भातील ओबीसी संघटनांची दुसरी बैठक काल (१३ सप्टेंबर) नागपुरात पार पडली. सरकारच्या शासन निर्णयानंतर मराठवाड्यातील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली. सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. याविरोधात रस्त्यावरील लढाई लढण्याची तयारी ओबीसी संघटनांनी कालच्या बैठकीत दर्शवली. त्यानंतर नागपुरात १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्च्याची घोषणा करण्यात आली आहे. जे कोणी या शासन निर्णयाविरोधात आहेत, त्या संघटना आणि नेत्यांना या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करतो, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Reservation controversy : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अस्वस्थता !

माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ असो की ओबीसी कार्यकर्ता असो ज्यांचा या शासन निर्णयाला विरोध आहे, जे कोणी पक्षाची पादत्राणे बाहेर ठेवून या लढ्यात सहभागी होतील, त्या सगळ्यांचे या मोर्च्यात स्वागत असेल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. या महामोर्चात कोणत्याही पक्ष किंवा संघटनेचा बॅनर असणार नाही. तर ओबीसी कार्यकर्ताच या मोर्चाचे निमंत्रक आणि आयोजक असणार आहे, असेही वडेट्टीवर म्हणाले.

नागपुरात १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम पासून होणार आहे, तर मोर्चाची समाप्ती संविधान चौकात होईल. सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही, हे असत्य सरकार सांगत आहे. त्यामुळे याविरोधात लढण्याची वेळ ओबीसी संघटनांवर आली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला ओबीसी संघटना इशारा देत आहे. तुम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावला आहे. हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे अशी, मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Sachin Sawant : आमची जागा आरबीआयला विकण्याचा व्यवहार रद्द करा, काँग्रेसची मागणी

सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात वकील संघटनादेखील एकवटल्या असून नागपूर खंडपीठात सोमवारी याचिका दाखल होणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. पण तरुणांनी टोकाचे पाऊल न उचलता आता समाजाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.