Officer arrested for accepting a bribe of four hundred rupees in Nagpur Rural RTO : नागपुरातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा प्रताप
Nagpur नागपुरातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने (एआरटीओ) एका दलालाच्या माध्यमातून ४०० रुपयांची लाच घेतली. या अधिकाऱ्याचे वेतन जवळपास एक ते दीड लाख रुपये आहे. त्याने वाहनाचा मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी लाचेची रक्कम घेतली. ही रक्कम घेताना दलालाला एसीबीने अटक केली. अशफाक मेहमूद अहमद (५७) असे लाचखोर एआरटीओचे नाव आहे. तर मिर्झा असराग अकरम बेग (३०, सतरंजीपुरा,नागपूर) असे अटकेतील दलालाचे नाव आहे.
नागपुरातील भालदारपुरा परिसरात राहणाऱ्या युवकाच्या बहिणीने एका नातेवाईकाकडून दुचाकी विकत घेतली होती. त्या दुचाकीची कागदपत्रे (मालकी हक्क हस्तांतरित) स्वतःच्या नावे करायचे होते. तसेच त्या युवकाच्या दोन मित्रांचेसुद्धा एका दुचाकीचे आणि एका कारचे कागदपत्र स्वतःच्या नावे करायचे होते. तिन्ही वाहनांसाठी नागपुरातील प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयातील सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्रीपदाचा निर्णय दोन दिवसांत !
मात्र, त्या अर्जावर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने (एआरटीओ) अशफाक मेहमूद अहमद हा सही करीत नव्हता. त्यामुळे तक्रारदार युवकाने आरटीओमधील दलाल मिर्झा असराग अकरम बेग याची भेट घेऊन अडचण सांगितली. त्याने एआरटीओ यांना पैसे दिल्यास अर्जावर सही होणार. अन्यथा अर्ज त्रृटीत जाईल. अशी माहिती दिली. त्यामुळे तक्रारदार युवकाने एका वाहनाचे चारशे रुपये देण्याची तयारी दर्शवली.
Congress Blames NIT for Corruption काँग्रेस म्हणते, ‘नासुप्रमध्ये भ्रष्टाचार होतोय’
मात्र, तत्पूर्वी, त्या युवकाने एसीबी कार्यालयात लाच मागितल्याप्रकरणी लेखी तक्रार दिली. ३ जानेवारीला तक्रारदार युवकाने दलाल मिर्झा असराग अकरम बेग याच्याकडे पैशाच्या व्यवहाराबाबत बोलणी केली. ६ जानेवारीला लाच स्विकारताना दलाल मिर्झा असराग अकरम बेग आणि एआरटीओ अशफाक महमूद अहमद यालाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध कपीलनगर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. पुढीत तपास पोलीस करीत आहेत.