व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू; मृतक खातेदारांच्या वारसांना संधी

‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू; मृतक खातेदारांच्या वारसांना संधी

Official registration of heirs of deceased account holders still registered on Satbara will be done : सातबारावर अद्यापही नोंद असलेल्या मृतक खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंद होणार

Gondia – Arjuni Morgaon : महसूल विभागाच्या १०० दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्यात १ एप्रिलपासून ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे शेतजमिनीच्या सातबारावर अद्यापही नोंद असलेल्या मृतक खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी केले आहे.

जमिनीच्या सातबारावर मृतक खातेदारांचे नाव राहिल्यास वारसांना जमिनीच्या मालकीसंबंधी व अन्य प्रशासकीय कामांसाठी अडचणी निर्माण होतात. वारसांची अधिकृत नोंद नसल्याने शेतीविषयक योजनांचा लाभ घेता येत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महसूल विभागाने संपूर्ण राज्यभर जिवंत सातबारा मोहीम हाती घेतली आहे.

Amravati Congress : काँग्रेस घालणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव !

असा असेल मोहिमेचा टप्पा..
१ ते ५ एप्रिल : गावनिहाय मृतक खातेदारांची यादी तयार करण्यासाठी गावच्या चावडीवर वाचन. ६ ते २० एप्रिल : मृत खातेदारांच्या वारसांनी तलाठ्याकडे मृत्यू दाखला, वारसांच्या नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे (प्रतिज्ञा लेख, पोलिस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांचे दाखले) सादर करणे. २१ एप्रिल ते १० मे : ई-फेरफार प्रणालीद्वारे वारसांच्या नोंदी मंजूर करून सातबारा दुरुस्त करणे.

Randhir Sawarkar : प्रकल्पग्रस्तांसाठी वयोमर्यादेची अट शिथील करा !

नागरिकांनी सहकार्य करावे..
तालुक्यातील सर्वच गावांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी वरूण कुमार शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी कार्यरत आहेत. ही मोहीम वारसांच्या हक्कांचे संरक्षण करणारी आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनींच्या सातबारावर मृतक खातेदारांची नोंद आहे, त्यांनी वेळेत कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!