The empty chairs in the Zilla Parishad made a mess : अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये होते व्यस्त
Wardha लोक आपल्या कामांसाठी जिल्हा परिषदेत येत होते. प्रत्येक जण रिकाम्या खुर्च्या बघून परत जात होता. सुरुवातीला काय झाले कळलेच नाही. मात्र थोड्या वेळाने सगळे अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धांसाठी मैदानात गेल्याचे सांगण्यात आले. कर्मचारी आणि अधिकारी मैदानात खेळांमध्ये व्यस्त होते. आणि इकडे सर्वसामान्य नागरिकांचा रिकाम्या खुर्च्या बघून हिरमोड झाला.
जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या या क्रीडा महोत्सवाकरिता जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत सामसूम आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर धामधूम दिसून आली.
MNS leader Amol Patil : पीक कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांची खैर नाही
अधिकारी व कर्मचारी सातत्याने कामात व्यस्त असतात. या कामातून थोडा विरंगुळा मिळावा, ताणतणाव हलका व्हावा, म्हणून या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. पण, काही अधिकाऱ्यांना व्हीसीमुळे या कार्यक्रमाला जाता आले नाही. तर काहींना तातडीने कार्यक्रम आटोपून कार्यालय गाठावे लागल्याने हिरमोडही झाला.
क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषदेतील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. अपवाद वगळता प्रत्येक विभागांमध्ये कार्यालय राखण्याकरिता काही कर्मचारी उपस्थित असल्याचे चित्र होते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्यांना रिकाम्या खुर्च्या पाहूनच परत जावे लागले. आता सोमवारपर्यंत तरी या कार्यालयातील कामकाज पुढे सरकणार नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून आतापर्यंत साजरा होत आला आहे. पण, यावर्षी वेगळे चित्र होते. पहिल्याच स्पर्धेपासून काही विभागातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. तर काही विभागातील मोजकेच अधिकारी व कर्मचारी दिसून आले. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसून आला.