Ajit Pawar for the post of President; Three candidates unopposed : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची निवडणुक, विजय निश्चित
Mumbai : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘ऑलिंपिक पॅनेल’चा विजय जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या रविवारी, म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अजित पवार गटाचे एकूण २१ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे बहुमताच्या जोरावर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची बाजू मजबूत मानली जात आहे.
या निवडणुकीसाठी ऑलिंपिक पॅनेलची घोषणा अर्जुन पदक विजेते अशोक पंडित आणि ध्यानचंद पदक विजेते प्रदीप गंधे यांनी केली. एकूण ३० मतदार संघटनांपैकी २२ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अध्यक्षपदासाठी अजित पवार उमेदवारी दाखल करत असून, वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी अशोक पंडित, तर उपाध्यक्षपदासाठी आदिल सुमारीवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याशिवाय उपाध्यक्षपदासाठी दयानंद कुमार यांना बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे. सचिवपदासाठी नामदेव शिरगांवकर, सहसचिवपदासाठी निलेश जगताप, उदय डोंगरे, मनोज भोरे आणि चंद्रजीत जाधव या उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. खजिनदारपदासाठी स्मिता शिरोळे आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी संदिप चौधरी, संदिप ओंबासे, राजेंद्र निम्बाते, गिरीश फडणीस, रणधीरसिंग, किरण चौगुले, समीर मुणगेकर, संजय वळवी आणि सोपान कटके यांची नावे जाहीर झाली आहेत.
Uddhav Thackeray : ‘सत्याच्या मोर्चा’पूर्वी उद्धव ठाकरे अडचणीत?
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि बिनविरोध निवडून आलेले उपाध्यक्ष प्रदीप गंधे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री आणि क्रीडा प्रशासनाला तसेच सर्व क्रीडा संघटनांना जाते. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनने राज्यातील सर्व क्रीडा संघटनांना सोबत घेऊन काम केले असून, राज्यातील खेळाडूंनी मागील तीन वर्षांत सलग राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळवला आहे. हे यश राज्यातील क्रीडा संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.
Encounter case : जर पैसे खरोखर येत असतील तर कुटुंबाला मदत करीन
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ऑलिंपिक भवनासह देशातील पहिले क्रीडा संग्रहालय उभारले जात आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली आहे. त्यामुळेच बहुसंख्य संघटनांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
अजित पवार म्हणाले की, ही कोणतीही राजकीय निवडणूक नाही. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही सर्व संघटनांना एकत्र आणले आहे. कोणी या निवडणुकीला राजकीय रंग देत असेल, तर ती क्रीडा क्षेत्रासाठी दुर्दैवी बाब आहे. निवडणूक खेळीमेळीच्या आणि क्रीडा भावनेने पार पडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Prakash Ambedkar : वाहने फोडायची असतील तर सत्ताधाऱ्यांची फोडा, आंबेडकर बरसले
अजित पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राने राष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार गटाचा विजय निश्चित मानला जात असून, महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
______
 
             
		
