Online robbery of Rs 10.87 lakh in the name of updating KYC : शासकीय योजनांच्या नावाने Online फसवणूक; १०.८७ लाखांनी लुटले
Amravati डिजिटल बँकिंगच्या युगात सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्या वापरून नागरिकांना गंडा घालत आहेत. अशाच प्रकारच्या एका फसवणुकीत अमरावतीच्या हमालपुरा परिसरात राहणाऱ्या योगेश रेवाराम गजभिये यांना केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने १०.८७ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सायबर गुन्हेगारांनी आता सरकारी योजनांच्या नावावर नवे Fraud सुरू केले आहे. दुर्दैवाने अनेक भागांमध्ये शेतकरी याचे बळी ठरत आहेत.
राकेश गुप्ता नावाच्या अज्ञात व्यक्तीने योगेश गजभिये यांच्या अॅक्सिस बँक खात्याची माहिती मिळवली. त्यात अनधिकृत प्रवेश केला आणि त्यांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली. योगेश गजभिये हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. सध्या अमरावतीतील हमालपुरा परिसरात व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. 12 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांच्या मोबाईलवर राकेश गुप्ता याचा फोन आला. त्याने स्वतःला बँकेचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याची गरज असल्याचे भासवले.
Justice Nitin Sambre : शासकीय योजना पोहोचल्या, तर न्यायही पोहोचेल!
बँकिंग नियमांनुसार केवायसी अपडेट करणे गरजेचे असल्यामुळे गजभिये यांनी संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवला. मात्र, हा सारा प्रकार फसवणुकीचा कट असल्याचे त्यांना उशिरा लक्षात आले. सायबर गुन्हेगाराने गजभिये यांच्या बँक खात्याचा ताबा मिळवून प्रथम 1 लाख 29 हजार 569 रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर 9 लाख 57 हजार 554 रुपयांचे वैयक्तिक कर्ज दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. असा एकूण 10 लाख 87 हजार 123 रुपयांचा फटका गजभिये यांना बसला.
Prataprao Jadhav : कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही!
बँक खात्यातून अचानक मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर गजभिये यांनी त्वरित बँकेशी संपर्क साधला. आपले खाते ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगाराने पैसे दुसऱ्या खात्यात वळवले होते. या संपूर्ण घटनेनंतर योगेश गजभिये यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे बीएनएस कायद्याच्या कलम 318(4), 319(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(क) व 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.