Online gaming : ड्रिम इलेवन, जंगली रमी सर्वकाही होणार बंद !

 

Dream XI, Junglee Rummy, everything will be closed : दोन्ही सभागृहात पास झाले प्रमोशन रेग्युलेशन ऑल ऑनलाईन गेमिंग बिल

New Delhi : क्रिकेट मॅचवर खेळल्या जाणाऱ्या ड्रिम इलेवन, माय इलेवन आणि ऑनलाईन जुगार म्हणून ओळखल्या जंगली रमी सारखे गेम बंद होणार आहेत. प्रमोशन रेग्युलेशन ऑल ऑनलाईन गेमिंग बिल संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झाले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पिढ्या जुगाराच्या विळख्यातून बाहेर पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता.

यासंदर्भात ओमराजे यांनी सभागृहाला सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील धाराशीव तालुक्यातील बावीगाव येथील लक्ष्मण जाधव नामक जेसीबी ऑपरेटरने त्याची पत्नी आणि दोन वर्षीय मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. या प्रकाराला जंगली रमी अॅप कारणीभूत आहे. जुगाराच्या विळख्यात सापडल्यामुळेच लक्ष्मणने हे अमानवी कृत्य केले. आता केंद्र सरकारने यावर आळा घालण्यासाठी कायदा केला, त्याचे स्वागत आहे.

Demand of loan waiver : मी मेल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या !

प्रमोशन रेग्युलेशन ऑल ऑनलाईन गेमिंग बिल लोकसभेत पास झाले त्यानंतर राज्यसभेतही पास झाले आहे. आता कुणालाही कुठलाही ऑनलाईन गेम खेळता येणार नाही. अगदी रमीसुद्धा खेळता येणार नाही. याचा परिणाम क्रिकेट या खेळावरही होणार आहे. अंदाजे १७ हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार, म्हणाले..

ऑनलाईन गेमिंसाठी कुणी ऑफर करत असेल तर त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि एक कोटी रुपये दंडाची तरतूद आहे. ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणाऱ्याला दोन वर्ष शिक्षा आणि ५० लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. पण गेम खेळणाऱ्याला मात्र कुठलाही दंड आणि शिक्षा ठोठावली जाणार नाही. खेळणाऱ्याला या कायद्यात पिडित मानन्यात आले आहे. केंद्र सरकारने हा कायदा आणून जुगाराच्या नशेतून लोकांना मुक्ती दिली आहे, अशा भावना हा कायदा पास झाल्यानंतर व्यक्त केल्या जात आहेत.