Breaking

Operation Lotus : निवडणुका कधी होणार माहिती नाही, पण भाजप लागले कामाला!

BJP focuses on Zilla Parishad elections : भाजपमध्ये इनकमिंग सुरू राहणार; जिल्हा परिषदेवर विशेष फोकस

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार हे माहिती नसले तरीही जिल्ह्यात भाजप सक्रीय झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डॅमेज करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी त्यादृष्टीने भाजपच्या नेत्यांनी कामही सुरू केले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर चिखले यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ऑपरेशन लोटस’ सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis : महिना झाला वीज नाही, शेतकऱ्यांना हवे स्वेच्छा मरण!

भाजपने नागपूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांवर फोकस केला आहे. यापूर्वी माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी सभापती उज्ज्वला बोढारे, माजी सदस्य समीर उमप, दुधराम सव्वालाखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता या कळीत चंद्रशेखर चिखले यांचे नाव जोडले गेले आहे.

Amravati Congress : ‘प्रभाग हाच किल्ला आहे’, काँग्रेसचा कार्यकर्त्यांना मंत्र

चिखले हे २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेंटपांजरा सर्कमधून विजयी होत जिल्हा परिषदेत पोहचले. अनिल देशमुख यांच्या पाठबळामुळे ते जि.प.चे उपाध्यक्ष झाले. यापूर्वी त्यांनी काटोल पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले आहे. २०१९ मध्ये त्यांचे मेटपांजरा जि.प. सर्कल ओपन असतानाही त्यांच्याऐवजी सलील देशमुख निवडणूक लढले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही चिखले देशमुख सोबत होते.

Akola Shiv Sena : चिखलगाव सर्कलमधील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांचा पराभव झाला. नुकतेच महिनाभरापूर्वी चिखले यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. शेवटी जवळपास महिनाभराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला.