Breaking

Operation Sindoor : ‘भारत माता की जय’चा गजर; लष्कराच्या शौर्याला सलाम

BJP conducted Tiranga rally : बुलडाण्यात भाजपची तिरंगा रॅली, देशभक्तीचे दर्शन

Buldhana भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरमधील पराक्रम व त्यागाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात सोमवारी (२० मे) भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली ही रॅली केवळ राष्ट्रप्रेमाचं प्रतीक न ठरता, आगामी राजकीय दिशा स्पष्ट करणारे शक्तीप्रदर्शन ठरले, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

शहरातील शिवालय येथील जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली जयस्तंभ चौक, त्रिशरण चौक, धाड नाका मार्गे तानाजी नगर शहीद स्मारकावर पोहोचून राष्ट्रभक्तीच्या घोषणा देत पूर्ण झाली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, हम सब एक हैं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Uddhav Thackeray Shiv Sena : शिवसेनेत नव्या दमाच्या नेतृत्वाला प्राधान्य

“ऑपरेशन सिंदूर”मध्ये जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठीच ही रॅली होती,” असं स्पष्ट मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विशेष उल्लेख केला तो म्हणजे ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा. “भारत की बेटींना सलाम” अशा फलकांनी रॅली अधिक प्रभावी झाली.

या रॅलीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांबरोबरच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक व इतर पक्षांचे स्थानिक नेतेही सहभागी झाले होते. यामध्ये महिला मोर्चा, भाजयुमो, कामगार मोर्चा, शिक्षक आघाडी, विश्व हिंदू परिषद व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

राजकीयदृष्ट्या पाहता, लोकसभा निवडणुकीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष शिंदे यांचे हे पहिलेच मोठे जनआंदोलन होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक ताकद व सामाजिक संपर्क किती भक्कम आहे, याचे दर्शन या रॅलीने घडवले आहे.

Chhagan Bhujbal returns as minister: भुजबळांच्या निमित्ताने राजकीय पक्षांचे एकत्रीकरण?

या रॅलीने केवळ भारतीय सैन्याच्या कार्याला मानवंदना दिली नाही, तर बुलडाण्यातील राजकीय वातावरणात ‘भाजप पुन्हा आघाडीवर’ असल्याचे संकेतही दिले, असे विश्लेषण राजकीय वर्तुळात होत आहे.