Chandrashekhar Bawankule attacks on Rahul Gandhi : दहशतवादाच्या विरोधात जगभरातील देशांना एकत्र करण्याचे काम सुरू
Nagpur राहुल गांधी यांना काही समज नाहीये. ते अभ्यास करत नाहीत अन् काहीही बोलतात. त्यांना काही नाही समजलं तर शिकून घ्यावं. त्यांचा एक नेता म्हणतो १५ हजार रुपयांचं ड्रोन होतं. यांना काय झालं कळत नाही. जे देशाला नाही समजू शकले, ते परराष्ट्र मंत्रालयावर टीका करतात. राहुल गांधी यांना वर्षातून दोन महिने विदेशात राहायचं आहे. अन् ते मोदींना धोरण शिकवणार का, असा सवाल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी आज (२४ मे) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दहशदवादाच्या विरोधात लढाईसाठी जगभरातील देशांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच खासदारांना पाठवण्यात आलं आहे. पांदण रस्त्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती. शेतांतील रस्त्यांवरून बैलगाडी, ट्रॅक्टर गेला पाहिजे. त्यासाठी सरकारी पांदण रस्त्यांवर झालेले अतिक्रमण काढण्याची मागणी होती. ही मागणी मान्य झाली आहे. शेतकऱ्यांना दोन पिके घेण्यासाठी पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चांगले पांदण रस्ते मिळणार आहेत. आता पांदण रस्ते १२ फुटांचे होणार आहेत.
Local body elections : कुणी काम केलं, नाही केलं, हे म्हणण्याचे दिवस नाहीत !
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मी पण काल व्हीसीद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक धेतली. लवकरच पंचनामे होऊन सर्वांना मदत मिळेल. निवडणुकांच्या बाबतीत कुठलाही संभ्रम नाही. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायुती मिळून लढणार आहे. काही ठिकाणी चर्चा होत आहेत की, स्थानिक स्तरावर आम्ही वेगळे लढू. पण महायुतीचा निर्णय एकत्र लढण्याचाच आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.