MP donates one month’s salary to soldiers : पंतप्रधानांना लिहिले पत्र, वैद्यकीय सेवा देण्याचाही शब्द
Gondia देशाच्या सीमेवर तणावाची स्थिती असताना संपूर्ण देश एकवटला आहे. भारतीय सेनेच्या शौर्याला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे. अशा गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी एक महिन्याचे वेतन व वैद्यकीय सेवा सैनिकांना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र देखील लिहिले आहे.
भारताकडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. अशा परिस्थितीत, देशाची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी सर्वच स्तरांतील योगदान महत्त्वाचे ठरत आहे. पडोळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय सेना सीमेवर रात्रंदिवस सज्ज आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहे. त्यांच्या या शौर्य आणि बलिदानासमोर आमचं योगदान क्षुल्लक आहे. पण, राष्ट्रसेवेतील कृतज्ञतेचा एक लहानसा भाग म्हणून माझे एक महिन्याचे मानधन सैनिक सेवेसाठी कपात करण्यात यावे.”
Mahayuti Government : बोनस अजूनही वाटेतच; खात्यात पैसे येण्यासाठी प्रतिक्षाच
“देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी जर प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिले, तर खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा होईल,” अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. “देश संकटात असताना प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. ही वेळ केवळ भाषणांची नाही, कृतीची आहे. सैनिकांसाठी काही करू शकलो तरच खऱ्या अर्थाने देशाचे ऋण फेडता येईल,” अशा भावना पडोळे यांनी व्यक्त केल्या.