Opposition welcomed attack on Pakistan : वंचित बहुजन आघाडीनेही केले जोरदार स्वागत
Akola पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कृतीचा गौरव करण्यासाठी अकोला शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भारतीय सैन्याचे जल्लोषात अभिनंदन करण्यात आले. तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फेही या घटनेचे स्वागत करण्यात आले.
दि. ७ मे रोजी दुपारी गांधी चौक येथे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मंगेश काळे, उपजिल्हाप्रमुख तरुण बगेरे, मुकेश मुरूमकर, उपशहरप्रमुख शरद तुरकर व संजय अग्रवाल आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Air Strike : काँग्रेसच्या त्या नेत्यावर नेटकऱ्यांचे ‘एअर स्ट्राईक’!
फटाके फोडून व नागरिकांना लाडू वाटून भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात राजेश मिश्रा, मंगेश काळे, तरुण बगेरे, मुकेश मुरूमकर, शरद तुरकर, अनिल परचुरे, प्रमोद धर्माडे, रुपेश ढोरे, संजय अग्रवाल, देवा गावंडे, राजेश इंगळे, राजेश कानपूरे, राधे शर्मा, मुन्ना भाऊ उकर्डे, यांच्यासह शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shivsena Eknath Sinde : आम्ही प्रवेश मागितलाच नाही, मग यादीत नाव कसे आले?
वंचित बहुजन आघाडीकडून मलकापूर चौकात फटाके फोडून व नागरिकांना पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका किरणताई बोराखडे, माजी जि. प. उपाध्यक्ष दामोदर जगताप, महिला महासचिव सुवर्णा जाधव, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, बाबाराव दंदी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.