व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation tiger : ठाण्यात शिंदे-ठाकरे गटातील गुप्त बैठकीची चर्चा !

Operation tiger : ठाण्यात शिंदे-ठाकरे गटातील गुप्त बैठकीची चर्चा !

eknath-shinde-shivsena-operation-tiger-thane-meeting-thackeray-mps-denial : ९ पैकी ८ खासदार उपस्थित असल्याच्या वृत्ताने खळबळ खळबळ

Thane : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर येत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ही बैठक ठाण्यात पार पडल्याचे सांगितले जात असून, ठाकरे गटातील ९ पैकी ८ खासदार या बैठकीला उपस्थित होते, असे वृत्त समोर आले आहे. मात्र, या सर्व घडामोडींना संबंधित खासदारांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अचानक एकनाथ शिंदे यांचा ताफा ठरलेल्या मार्गापासून वेगळ्या दिशेने वळल्याने चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात उशिरापर्यंत एक बैठक सुरू होती, ज्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदार यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेपर्यंत ही बैठक चालल्याचेही सांगितले जात आहे.

या कथित बैठकीत ठाकरे गटातील खासदारांना शिंदे गटात सामील होण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांना ‘मातोश्री’वर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी सर्व खासदारांनी पक्षाशी निष्ठावान राहण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता समोर आलेल्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’च्या हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

Ashok kharat case : १६० जीबी डिजिटल पुरावे, प्रत्येकाला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल सादर

दरम्यान, या कथित बैठकीत सहभागी झाल्याचे नाव घेतले गेलेल्या अनेक खासदारांनी या वृत्ताला ठाम नकार दिला आहे. खासदार अरविंद सावंत यांनी मी कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटात जाणार नाही, असे स्पष्ट करत बैठक झाल्याचे वृत्त फेटाळले. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही अशा कोणत्याही बैठकीची माहिती नसल्याचे सांगत, जर बैठक झाली असेल तर त्याचे पुरावे समोर आणावेत, असे आव्हान दिले.

याशिवाय, खासदार संजय देशमुख यांनीही आपण या बैठकीला प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित नव्हतो, असे स्पष्ट केले. मला या बैठकीचे कोणतेही निमंत्रण नव्हते आणि मी त्यात सहभागी झालेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

District Bank elections : आजोबा, वडील आणि आता नातू… जिल्हा बँकेवर घराणेशाहीची मोहोर!

एकूणच, ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी नसल्याने आणि संबंधित खासदारांकडून नकार देण्यात आल्याने या प्रकरणाबाबत संभ्रम कायम असून, पुढील काही दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!