Breaking

Operation Tiger in Vidarbha : माजी खासदार म्हणतात, गद्दारांच्या पक्षात जाणार नाही!

Prakash Jadhav dismissed reports of joining Shindesena : शिंदे सेनेत जाण्याचे वृत्त प्रकाश जाधव यांनी फेटाळले

Nagpur शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने माझा पिंड घडला आहे. गद्दारांसोबत कधीही जाणार नाही. या गद्दारांना काही दिवसांतच त्यांची जागा दाखवून देऊ, असा खणखणीत इशारा देत शिवसेना शिंदे गटात जाण्याचे वृत्त माजी खासदार प्रकाश जाधव यांंनी ‘सत्तावेध’शी बोलताना फेटाळून लावले. परंतु, तरीही विदर्भात ऑपरेशन टायगरची दहशत कायम असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे सेनेची आभार सभा आज (शुक्रवार) दुपारी नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे होते. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित राहणार आहेत. या सभेला नागपूरसह भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणर आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर राज्यातील प्रत्येक भागात आभार सभा घेण्याचा सपाटा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लावला आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरेंचे आमदार-खासदार म्हणणार, ‘मी शपथ घेतो की’!

या आभार सभांमध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची उजळणी घेतली जात आहे. तसेच पक्षाचे संघटन बळकट करण्याचे आवाहन केले जात आहे. रामटेक हा शिवसेनेचा गड राहिला आहे. या मतदारसंघातून अनेकदा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आशीष जयस्वाल यांना पहिल्यांदा राज्य मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. त्याचप्रमाणे कृपाल तुमाने यांना लोकसभेत संधी मिळाली नव्हती. परंतु, विधान परिषदेत वर्णी लागली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेला मात खावी लागली होती. परंतु विधानसभेत रामटेकमध्ये यश मिळाल्याने या पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Ramesh Chennithala : रमेश चेन्नीथला महाराष्ट्र काँग्रेसच्या मानगुटीवर कायम!

यासाठी रामटेक व नागपुरातील काही शिवसेनेचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नावाची चर्चा होती. या आभार सभेत शिवसेनेचे काही ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे बोलले जात होते. ऑपरेशन टायगर आता विदर्भात होणार असल्याचे बोलले जात आहे. नागपूर जिल्ह्यात ‘दे धक्का’ असे फलक जागोजागी लावण्यात आलेले आहेत.

ऑपरेशन टायगर फेल होणार
अनेक मोठे नेते शिंदेसेनेच्या गळाला लागणार असल्याचे बोलले गेले. परंतु नावे मात्र जाहीर केलेली नाही. यात प्रामुख्याने प्रकाश जाधव यांचे नाव घेतले जात होते. या संदर्भात सत्तावेधशी बोलताना जाधव म्हणाले, ‘शिंदे सेनेत जाण्याचा कोणताही विचार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने मी शिवसेनेत आलो आहे. काही गद्दार शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. परंतु आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षात काम करणार आहे.’

Nana Patole : ‘राजीनामा नानां’चे पुढचे पाऊल कोणत्या दिशेने?

जे सोडून गेले ते सत्तेसाठी
केवळ पैसा व सत्तेसाठी हे लोक गेलेले आहेत. त्यांच्याजवळ कोणताही विचार नाही. पुन्हा मूळ शिवसेना पक्षाला मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करीत राहू. पक्ष अडचणीत असताना पक्ष मजबूत करण्याऐवजी सोडून जाणे शहाणपणाचे नाही. येत्या काही वर्षात पुन्हा शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करीत राहू, ऑपरेशन टायगर फेल होईल, असेही जाधव यांनी सांगितले.