Breaking

Operation Tiger : महायुतीच्या टार्गेटवर महाविकास आघाडी!

MVA on Mahayuti’s Target : ‘ऑपरेशन टायगर’ होणारच असल्याचा महाजनांचा दावा

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अगोदर महायुतीकडून महाविकासआघाडीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संकेत दिले आहेत. अनेक जण मविआतून महायुतीत येण्यास इच्छुक आहेत. त्याबाबत लवकरच योग्य ती पावले उचलली जातील. असा दावा त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार महायुतीत येणार असल्याची चर्चा आहे. खरे काय कुणालाच माहिती नाही. संबंधित खासदारांनीही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र याबाबात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या काही दिवसात महाविकास आघाडीला गळती लागल्याचे दिसेल, असे सांगून ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठे विधान केले.

MoS Prataprao Jadhav : पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ठाकरे सेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसह अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ते सर्व महायुतीत यायला इच्छुक आहेत. दररोज संपर्क सुरू आहे. नगरसेवकांना मुख्य प्रवाहात यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. येत्या काही दिवसातच याची सर्वांना प्रचीती आल्याचे दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dabhadi robbery case twist : दाभाडी येथील दरोडा प्रकरणाला कलाटणी

नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला महायुतीने स्थगिती दिली आहे. महायुतीमधील तीनही पक्षांनी आमचा पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

काही लोक अजूनही ईव्हीएमबाबत बोलत आहेत. मात्र ईव्हीएमचा प्रश्न निकाली निघाला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना ईव्हीएममुळेच आपला पराभव झाल्याचे वाटत आहे. लोकसभेच्या वेळी ते ईव्हीएमबाबात काहीच बोलले नाहीत. विधानसभेच्या निकाल विरोधात जाताच त्यांना घोटाळा दिसू लागला आहे. पराभव झाला म्हणून विरोधात बोलायचे म्हणून ते बोलत आहेत, असे गिरीश महाजन म्हणाले.