Opponents counterattack : मेमनची फाशी रद्द करा म्हणणारांच्या मतदारसंघातील यादी तपासा !

Mangalprabhat Lodhas counterattack on opponents : मंगलप्रभात लोढा यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : मतदार याद्यांमधील गोंधळावरून विरोधकांनी आज मुंबईत “सत्याचा मोर्चा” काढला. या मोर्चाच्या माध्यमातून मतदार यादीतील अनियमितता दूर करण्याची मागणी करण्यात आली. मात्र या आंदोलनावर आता राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी थेट आरोप करत म्हटलं “याकुब मेमनची फाशी रद्द करा” म्हणणाऱ्या तीन महापुरुषांच्या मतदारसंघातील यादी तपासा; तिथं हजारोंच्या संख्येने रोहिंग्या आणि बांग्लादेशी मतदार सापडतील.”

लोढा म्हणाले, “विरोधक म्हणतात मतदार यादीत घोळ आहे मी त्यांचं समर्थन करतो. पण आधी त्यांच्या घरचं बघा. याकुब मेमनची फाशी रद्द करावी असं सांगणारे तीन आमदार अबु आझमी, नसिम खान आणि अमिन पटेल यांच्या मतदारसंघातील यादी तपासा. त्यांच्या मतदार यादीत किमान 5 हजार रोहिंग्या आणि बांग्लादेशी आढळतील. जर सापडले नाहीत तर मी राजीनामा देईन, पण सापडले तर तुम्ही द्या,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

Farmers’ struggle : बच्चू कडुंवरच उलटला त्यांचा ‘प्रहार’, शेतकऱ्यांचा विश्र्वासघात की रणनितीचा विजय?

तसेच, लोढा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. “मुंबईच्या दुर्दशेला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. स्टँडिंग कमिटी लुटली गेली. मुंबईचा विकास ठप्प झाला. मी दोन दिवसांत निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. मतदार याद्यांबाबत विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी. कुणी रोहिंग्यांना आणि बांग्लादेशींना मतदार याद्यांमध्ये घुसवले हे स्पष्ट झाले पाहिजे,” असे लोढा म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मी नुकताच मालाडमध्ये जनता दरबार घेतला. तिथं मालाड-मालवणी विधानसभा क्षेत्रात तब्बल 22 हजार 428 अनधिकृत बांधकामं आहेत. 82 एकर सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकामं केली गेली आहेत. हे सर्व प्रकार मुंबईकरांच्या नजरेसमोर सुरू आहेत. पण आता आम्ही ते थांबवणार आहोत. मुंबईकरांनी आवाज उठवला पाहिजे मुंबई ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ‘मालवणी पॅटर्न’ किंवा ‘याकुब मेमन पॅटर्न’ मुंबईत चालणार नाही. आता फक्त देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा पॅटर्न चालेल,” असं लोढा यांनी ठामपणे सांगितलं.

Farmers’ fight for debt relief : बच्चू कडू यांनी उलगडले ३० जूनच्या मुदतीमागचे गुढ !

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही विरोधकांच्या मोर्चावर टीका केली. ते म्हणाले, “महाविकास आघाडी हा केवळ गोंधळाचा आघाडी आहे. काँग्रेससारख्या पक्षानेही या मोर्चातून अंग काढून घेतलं. त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. ठाकरे बंधू वर्षानुवर्षं भावनिक आवाहनं करून जनतेला गुंतवत आले, पण आता महाराष्ट्राने त्यांचा खरा चेहरा ओळखला आहे.”

विरोधकांच्या “सत्याच्या मोर्चा”विरोधात भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण आणखी तापलं असून, मतदार याद्यांवरील वाद आता चांगलाच चिघळला आहे.

______