Speaker pointed, saying the application came after four months : चार महिन्यांनी अर्ज आला म्हणत अध्यक्षांनी वर्मावर ठेवले बोट
Mumbai : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर दुसरे अधिवेशन सध्या सुरू आहे. हे अधिवेशन पण विरोधी पक्ष नेत्या शिवाय होत आहे. आवश्यक ते संख्याबळ नसले तरी मागील अनुभव पाहतात हे पद भरावे अशी विरोधकांची मागणी असून ते या विषयावर आक्रमक होत आहेत पण सरकार स्थापनेनंतर चार महिन्यांनी अर्ज आला त्यामुळे त्यावर निर्णय घ्यायला थोडा वेळ लागेल असे सुचित करत विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवले आहे.
विधानभवनात विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे आमदार उपस्थित होते. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाचे 29 आमदार निवडून आलेले नसल्याने राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहण्याची चिन्हे आहेत. संख्याबळाचा निकष असला तरी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात 1986 ते 1990 या काळात पुरेसे संख्याबळ नसतानाही जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचं दुसरं विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे, विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचीही वर्णी लागलेली नाही. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीमधील नेत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आज पुन्हा या निवडीवरुन सभागृहात गोंधळ झाला. . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना दिलेल्या सूचनेनुसार विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा समोर आणण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले, त्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजीही केली.
विधानभवनात विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय कधी घेणार? हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांना विचारण्यात आला. त्यावर, बोलताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की सरकार स्थापन झाल्यानंतर चार महिन्यांनी या संदर्भातला अर्ज आला आहे मला यावर थोडा वेळ लागेल. विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्षांचे उत्तर महाविकास आघाडीतील आमदारांना मिळालं. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. तसेच, लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात यावी, अशी मागणीही आमदारांनी केली.
Thackeray Brand : ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? पण ब्रँडचा धसका!
महाविकास आघाडीचे आमदार सभागृहातून थेट बाहेर आले. त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर ही आंदोलन केलं. सरन्यायाधीशांचा सत्कार होत असताना सभागृह विरोधी पक्षाविना असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते पदावर आक्रमक होऊन महाविकास आघाडीतील आमदारांनी घोषणाबाजी केली. एवढेच काय तर महायुतीतील आमदार एका मागे एक विधान भवनात प्रवेश करत असताना विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
____