Demand for a special session to resolve farmers’ issues : ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचे सरकारला आवाहन, अमरावतीत साधला संवाद
Amravati ‘प्रत्येक अधिवेशनात कृषी समस्यांवर चर्चा व्हावी. त्यासाठी लोकसभा, राज्यसभा तसेच राज्यांच्या विधिमंडळात विशेष सत्र आयोजित केले जावे,’ असे आवाहन कृषी विषयाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. शेतकरी आत्महत्यांवरील नियंत्रणासाठी प्रत्येक राज्यात नैराश्य निवारण आयोग स्थापन होण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
अमरावती येथे पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. यावेळी राजेश टिकैत यांनीही संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. ‘शेतकरी आत्महत्या का करतो याचे संशोधन करण्यापेक्षा सरकार थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करण्याच्या तयारीत आहे. मात्र, महाराष्ट्रात असा प्रकार होऊ देणार नाही. देशाच्या विविध भागांत आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी लिलाव होण्यापासून रोखल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आम्ही असे प्रयोग करणार आहोत,’ असं ते म्हणाले.
Rakesh Tikait : आत्महत्या करू नका, आंदोलनाचा करंट निर्माण करा
ते म्हणाले, “अलीकडेच महाराष्ट्रात आरक्षणासाठी मोठे आंदोलन झाले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी मोठे आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. योग्य काळात दिल्लीप्रमाणेच डेरा आंदोलनाचा विचार केला जात आहे. सध्या कापसावरील ११ टक्के आयात शुल्क माफ करण्यात आल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात येईल.”
टिकैत म्हणाले, “देशात दरवर्षी एक लाखांपेक्षा जास्त आत्महत्या होतात. मात्र शेती बहुतेकदा घरातील वडिलधाऱ्यांच्या नावे असल्याने त्या सर्वांचा समावेश शेतकरी आत्महत्यांत होत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील प्रत्येक आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. सरकारकडून शेतकरीहिताची कोणतीही भूमिका घेतली जाईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.”
Municipal Corporation Election : अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष !
पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डिकर, डॉ. अशोक ढवळे, राजन क्षीरसागर, डॉ. अजित नवले, प्रा. सुशीला मोराळे, किशोर डमाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.