Breaking

Padmashree Award : पद्मश्री राधाबहन भट सात दशकांपासून सर्वोदयी !

Padmashri Radhabhaan Bhat has been a Sarvodayi for seven decades : सेवाग्राम आश्रमच्या राहिल्या अध्यक्ष

Wardha गेल्या सात दशकांपासून सर्वोदयाचे कार्य करणाऱ्या आणि सर्व सेवा संघाच्या माजी अध्यक्ष राधाबहन भट यांना पद्मश्री जाहीर झाला. आणि सात दशकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. ९२ वर्षीय राधाबहन भट या उत्तराखंड राज्यातील आहेत. अनेक वर्षांपासून त्या सर्वोदयाशी जुळलेल्या आहे.

राधाबहन भट या सर्व सेवा संघ व गांधी शांती प्रतिष्ठानच्या पहिल्या महिला अध्यक्षा राहिल्या आहेत. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या माजी पदेन सदस्य होत्या. गांधी संस्था, सर्वोदय आणि नयी तालिमच्या कार्यांना त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सर्वोदयाशी जुळलेल्या अनेक कार्यांत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला असून, अनेक आंदोलने व चळवळीतही सक्रिय आहेत. हिमालय बचावसाठी काढलेल्या पदयात्रेमुळे ‘हिमालय की बेटी’ असे नवे नावही त्यांना मिळाले.

Samruddhi Mahamarg : एकामागोमाग धडकल्या कार !

आंदोलनामुळे नवी दिशा व ओळख त्यांना मिळाली. उत्तराखंडातील अल्मोडा जिल्ह्यातील कुमाऊँ कौसानी येथील सरला बहन या गांधी विचार व कार्यावर काम करणाऱ्या विदेशी महिला. त्यांनी स्थापन केलेल्या लक्ष्मी आश्रमात शिक्षिका म्हणून राधाबहन सेवारत होत्या. त्या आश्रमाच्या अध्यक्षसुद्धा राहिल्या असून, सध्या त्या विश्वस्त आहेत.

त्यांनी हिमालय बचावसाठी ७५ दिवसांची पदयात्रा केली होती. त्यांचा चिपको आंदोलनात सक्रिय सहभाग होता. गढवाल भागातील टेहरी डॅमसाठी आंदोलन केले आहे. भुदान यात्रेत आचार्य विनोबा भावे यांच्या सोबत पदयात्रा, पहाडी भागात लक्ष्मी आश्रमांतर्गत बालके, मुली आणि महिलांसाठी शिक्षण व रोजगाराचे कार्य केले. याशिवाय दारूबंदी अंमलबजावणी व पर्यावरणावर कार्य केले.

Accident in Gondia : बोलेरोची दुचाकीला धडक, आईसह दोन चिमुकले ठार

सरला बहननंतर नयी तालीमचे कार्य अखंडपणे करीत आहेत. आंदोलनातील सहभागामुळे तुरुंगवासही भाेगावा लागला. राधाबहन यांना आतापर्यंत जानकीदेवी बजाज पुरस्कार, गोदावरी पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार व मुनी संतबाल पुरस्कार मिळाला आहे. आता पद्मश्री पुरस्काराची घोषणा केली आहे.