Breaking

Pair of bulls in Shankarpat : जिल्ह्यातून ‘केसरी-मन्या’, तालुक्यातून ‘चिमणा-जगवार’ प्रथम

Shankarpat and Agricultural Festival at Allipur Dist Wardha : अल्लीपूर येथे शंकरपट, महिलांनीही हाकल्या बैलजोड्या

Wardha अल्लीपूर येथील शंकरपट कमिटीच्यावतीने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शंकर पट व कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शंकरपटात राज्यभरातून बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. या शंकरपटात जिल्हा गटातून कोमल नांदूरकर यांच्या ‘केसरी-मन्याने‘, तर तालुका गटातून अंश कोरडे यांच्या ‘चिमणा-जगवार’ यांनी प्रथम क्रमांक पटाकावला.

अल्लीपूर येथील शंकर पटामध्ये राज्यभरातून ४५८ बैलजोड्या विविध गटांमध्ये सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे महिलांनीही धुरकरी होऊन शंकरपट हाकलला. त्यामुळे पट पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होती. दोन ते तीन दिवस दाणीवर धावलेल्या या बैलजोड्यांनी बघ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

Gondia Police : सीट बेल्ट लावला नाही, ५५ लाख २३ हजार रुपयांचा दंड !

शंकरपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह नागरिकांचीही उपस्थिती होती. शंकरपटाच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, मदन चावरे, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू, माजी सरपंच माणिक कलोडे उपस्थित होते. बैलजोडी मालकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

तालुका गटामध्ये चानकी येथील अंश कोरडे यांच्या चिमणा-जगवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. चाणकीच्याच गोपाल कामडी यांच्या बिबट्या-भोवऱ्या यांनी द्वितीय, कुणाल काकडे यांच्या रुबाब-तिरंगा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अल्लीपूर येथील लक्ष्मण सुपारे यांच्या भोजाजी-बिजाजी यांनी चतुर्थ, तर कानगाव येथील युवराज भलवांडे यांच्या सर्कीट-सुलतान या बैलजोडींनी पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Ambazari Road Construction : अर्धा मार्ग बंद होणार, पूर्ण मार्ग खुला होणार!

जिल्हा गटात कोमल नांदूरकर यांच्या केसरी-मन्या यांनी प्रथम क्रमांकावर मोहोर उमटवली. भिडी येथील बंडू डफरे यांच्या इशारा-मथूर यांनी द्वितीय, विरूळच्या आशिष चालनकर यांच्या भोजाजी-सुंदर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर पाथरी येथील सुरेश राऊत यांच्या शिव-पिस्तूल यांनी चतुर्थ, भिडीच्या बंडू डफरे यांच्याच शंभू-जगवार यांनी पाचवा, तर नागापूर येथील निखिल माहुरे यांच्या बुलेट-सोन्या या बैलजोडीने सहाव्या कमांकावर समाधान मानले.