Breaking

Pakistani terrorists : आरएसएस मुख्यालयावर हल्ल्याचा कट रचणारा अबू सैफुल्ला ठार !

Abu Saifullah, who plotted to attack RSS headquarters, killed in Pakistan : पाकिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या मागे कुणाचा हात ?

पाकिस्तानात अज्ञात ऑपरेशन सुरू आहे. खुंखार दहशतवाद्यांना काही अज्ञात लोकांकडून गोळ्या घातल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत अशा १६ दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्याची माहिती आहे. गेल्या तीन महिन्यांत अशाच तीन दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. हे ऑपरेशन कोण चालवत आहे, कुणाच्या सांगण्यावरून चालवत आहे, याची मात्र माहिती मिळू शकली नाही.

लष्कर – ए – तैय्यबाचा अबू सैफुल्ला, अबू कताल आणि जमियत एलेमाचा दहशतवादी मुफ्ती शहीर या तिघांना गेल्या तीन महिन्यांत यमसदनी पाठवण्यात आलं आहे. अबू सैफुल्ला याला रविवारी (१८ मे) गोळ्या घालण्यात आल्या. पाकिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या मागे कुणाचा हात आहे, हा आता शोधाचा विषय बनला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात शुटरने सैफुल्लावर गोळ्या झाडल्या. यात तो ठार झाला.

Operation Sindoor : ‘भारत माता की जय’चा गजर; लष्कराच्या शौर्याला सलाम

अबू सैफुल्ला भारतात अतिरेकी पाठवून कारवाया करत होता. सन २००६ मध्ये अबू सैफुल्लाने आरएसएसच्या मुख्यालयावर हल्ल्याचा कट रचला होता. तर २००८ मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवरचा हल्ला सैफुल्लानेच घडवून आणला होता. हाफीज सईदचा निकटचा सहकारी अबू कताल याच्यावरही १५ मार्चला गोळ्या झाडण्यात आल्या. अबू कतालने जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्यांचे अनेक कट रचले होते. काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यातही कताल सहभागी होता. या हल्ल्यात १० पर्यटक ठार झाले होते.

Maharashtra Politics : भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश, आता नाशिकचे पालकमंत्री कोण? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं..

मुफ्री मिर शाह याची बलुचिस्तानात १४ मार्च रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुलभूषण जाधव यांचं अपहरण करण्यात मुफ्ती मिरने आएसआयला मदत केली होती. नमाज पठन झाल्यानंतर मशिदीतून बाहेर येताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या दहशतवाद्यांना कोण मारत आहे, हे माहिती नसले तरी ही चांगली बातमी आहे. अद्याप तरी या हल्ल्यांची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही आणि पाकिस्तान सरकारही याची माहिती मिळवू शकलेले नाही.