Breaking

Chandrashekhar Bawankude : पंचायत राज सिस्टीम भक्कम, महसूल मंत्री बावनुकळेंची माहिती !

Panchayat Raj system is strong, says Revenue Minister Chandrashekhar Bawankude : जिल्हा परिषदेच्या कामांसाठी क्वालिटी कंट्रोल धोरण

Nagpur : विविध विकास कामांसाठी शासन निधी उपलब्ध करून देते. यात शाळेच्या वर्ग खोल्यांपासून मातीच्या रस्त्यांपर्यंतची कामे अंतर्भूत आहेत. या कामांची गुणवत्ता अधिकाधिक चांगली कशी होईल, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आता त्यासाठी क्वॉलिटी कंट्रोल धोरण आखून त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीनंतर महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ग्रामीण भागात विविध सुविधा पोहोचाव्या, यासाठी शासनाने पंचायत राज सिस्टीम भक्कम केली आहे. जिल्हा परिषद हे यासाठी मुख्य माध्यम आहे. पाच वर्षाच्या कार्यकाळात सुमारे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी हा विविध विकास कामांसाठी आपण नागपूर जिल्ह्यात खर्च करतो. या कामांच्या गुणवत्तेबाबत उपस्थित होणारे प्रश्न लक्षात घेता लवकरच जिल्हा परिषदेच्या कामांसाठी क्वॉलिटी कंट्रोल धोरण आखण्यात येईल.

School ID scam : काय आहे ‘तुकडी घोटाळा’, अनिल देशमुखांनी सांगितले !

विविध विकास कामांसाठी शासन निधी उपलब्ध करून देते. यात शाळेच्या वर्गखोल्यांपासून मातीच्या रस्त्यांपर्यंतची कामे अंतर्भूत आहेत. या कामाची गुणवत्ता अधिकाधिक चांगली कशी होईल, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शासकीय इमारतींना चांगली तरतूद असूनही कामाचा दर्जा मात्र दिसत नाही, असे सांगून राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी शासकीय इमारतींच्या कामातील गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule : नुकसानाचा काटेकोर अहवाल तयार करा, कुणीही वंचित राहायला नको

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेवर ब्लॉकच्या वापरातून केलेले रस्ते याबाबत प्रश्नचिन्ह आहे. बऱ्याच ठिकाणी जुने पेवर ब्लॉक नवीन कामात वापरले जातात. रस्त्यांच्या कामात रामटेक प्रमाणे रस्ते निर्माण झाले पाहिजे. यापुढे कुठेही पेवर ब्लॉकचे रस्ते तयार करू नका, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गत तीन वर्षांत जी कामे झाली आहेत, त्याचे थर्ड पार्टी ऑडिट हे व्हीएनआयटीकडून करून घेऊ, असे ते म्हणाले. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, स्मशानभूमी, पांदणरस्ते, शौचालय, दिवाबत्ती, पाणी पुरवठा अशाच कामांवर उपलब्ध निधी गुणवत्तेनुसार खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले.