BJP rebel took help of Congress for the post : उपसभापतीपद संदीप कापगते; भाजपमध्ये अस्वस्थता
Arjuni Morgaon Gondia लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणारी बंडखोरी कमालीची चर्चेत होती. या बंडखोरीचा महायुती आणि महाविकास आघाडीलाही जबरदस्त फटका बसला होता. आता अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोराने चांगलाच धक्का दिला आहे. काँग्रेसच्या मदतीने या बंडखोर नेत्याने उपसभापतीपद मिळविले आहे.
पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. यात सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आम्रपाली डोंगरवार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीने नाट्यमय वळण घेतले. ऐनवेळी भाजपमधून वेगळी चूल मांडणारे संदीप कापगते यांनी कांग्रेसची मदत घेतली. काँग्रेसच्या चार सदस्यांच्या पाठिंब्याने त्यांची उपसभापतिपदी निवड झाली. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Politics of District Central Cooperative Bank : बँकेत ‘अविश्वास’ मांडणारेच अविश्वासाच्या घेऱ्यात
येथील पंचायत समितीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक एकतर्फी होईल असे चित्र स्पष्ट होते. सभापतिपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. या प्रवर्गातील त्या एकमेव सदस्य असल्याने गोठणगाव पंचायत समिती क्षेत्रातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्रपाली डोंगरवार यांची सभापतिपदी वर्णी लागणार हे स्पष्ट झाले होते. सोमवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीदरम्यान सभापतीपदासाठी आम्रपाली डोंगरवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसभापतिपदासाठी मात्र भाजपमध्ये अखेरपर्यंत रस्सीखेच सुरू होती. भाजपकडून ताडगाव क्षेत्रातून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य नूतनलाल सोनवाने व भाजपाचे निमगाव क्षेत्रातून विजयी झालेले संदीप कापगते या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या क्षणापर्यंत दोघांनीही माघार घेतली नाही. परिणामी दोघांमध्ये सरळ लढत झाली. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नूतनलाल सोनवणे यांना ६ मते पडली. तर बंडखोरी करणारे उमेदवार संदीप कापगते यांना काँग्रेसच्या पाठिंब्याने ८ मते मिळाल्याने त्यांची उपसभापतिपदी बहुमताने निवड झाली








