Breaking

Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू !

Political parties geared up for Panchayat samiti elections : गोरेगावच्या वाट्याला येणार महिला सभापती

Goregaon Panchayat Samiti पंचायत समिती सभापतीपदासाठी सोडत जाहीर होताच आता राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. सभापतीपदासाठी नावांची चर्चाही सुरू झाली आहे. विशेषतः गोरेगावला सभापतीपदासाठी महिलांचे आरक्षण जाहीर झाले. पण अगदी त्यापूर्वीच अनेकांनी तयारी सुरू केली होती.

स्थानिक पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता आहे. यातच अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने १२ पैकी दहा जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले. अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने पुढील अडीच वर्षांसाठी शुक्रवारी (दि.१०) सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात येथील पं. स. सभापतिपद सर्वसाधारण महिला राखीव निघाले. त्यामुळे गोरेगाव पंचायत समितीवर महिलाराज राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Gondia Police : मुलांना सांगा.. वाहन जपून चालवा !

पंचायत समितीच्या सभापतीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नलिनी इसुलाल सोनवणे, शीतल सुरेंद्र बिसेन, चित्रकला योगेश चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. या तिघांपैकी नेमकी कुणाची सभापतिपदी वर्णी लागते याकडे तालुकावासीयांच्या नजरा लागल्या आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीच्या पूर्वी नलिनी सोनवाने या जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर २०१३ मध्ये चित्रकला चौधरी यांनी एक वर्षासाठी गोरेगाव पंचायत समितीचे सभापतिपद सांभाळले होते.

शीतल बिसेन या नवख्या असल्या तरी त्यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे सभापतिपदी नेमकी कुणाची वर्णी लागते व भाजपचे वरिष्ठ नेते कुणाला संधी देतात हेसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उपसभापतिपदासाठीही रस्सीखेच सुरू आहे. यात पंचायत समितीचे गटनेते पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे आघाडीवर आहेत. तसेच निंबा पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे व किशोर पारधी हेसुद्धा शर्यतीत आहेत.

Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू !

बडोले, रहांगडालेंच्या मनात काय?
गोरेगाव तालुक्याचा अर्धा भाग हा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात तर अर्धा भाग हा तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या शर्यतीत दोन्ही आमदाराची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. आ. राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले हेच याबाबत निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आरक्षण सोडतीनंतर आता सर्वांचे लक्ष सभापतिपदी नेमकी कुणाची वर्णी लागते याकडे आहे.