Breaking

Pankaj Bhoyar : हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे प्रश्न निकाली काढणार

Housing Finance Corporation issues will be resolved : सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आश्वासन

Wardha दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. मुंबईला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी कॉर्पोरेशनला आर्थिक पाठबळ देण्यात येईल. यासोबतच कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे सहकार, गृहनिर्माण, गृह ग्रामीण व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

कॉर्पोरेशनच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. मुंबई अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप व संचालक मंडळाने सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अडचणीबाबत चर्चा केली.

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेनेचा ‘चक्काजाम’

राज्यातील मध्यमवर्गीय अल्प उत्पन्न गट, पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त, कामगार, शेतकरी, भटके व विमुक्त मागासवर्गीय घटकातील नागरिकांच्या स्वप्नातील घर व्हावे यासाठी वित्त पुरवठा करण्यात येत होता. या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६० रोजी झाल. ९१२० सभासद आहेत. कॉर्पोरेशनने आजपर्यंत २ लाख १८ हजार ५६५ गाळ्यांची निर्मिती केली आहे.

राज्यातील सहकारी, गृहतारण संस्था व वैयक्तिक सभासदांना दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणारी राज्यातील एकमेव संस्था होती. आज संस्थेने ६३ वर्षांची वाटचाल केली आहे. कॉर्पोरेशनजवळ स्वमालकीची बांद्रा कुर्ला येथे ९ मजली हाउसफिन भवन व २१ जिल्ह्यांमध्ये मालकीची जागा आहे. हाउसफिन भवनातील काही मजले भाड्याने देण्यात आल्याने त्यातून वार्षिक १२ कोटी रुपये भाडे दरवर्षी प्राप्त होते.

Nitin Deshmukh : संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा

कॉर्पोरेशनजवळ कोट्यवधींची मालमत्ता आहे. मागील दोन वर्षांपासून संस्था फायद्यात आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने कर्ज वाटप बंद आहे. शासनाची थकहमी मिळण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत शासनसुद्धा सकारात्मक आहे. यावेळी संचालक प्रकाश दरेकर, सीताराम राने, ॲड. दत्तात्रय वडेर, प्रथमेश गिते, डॉ़ सतीश पाटील, विजय मराठे, ॲड. वसंतराव तोरवने, विश्वास पाटील, वृषाली चव्हाण, सागर काकडे, शिवाजीराव शिंदे, सुनील जाधव, दिलीप चव्हाण, हरीहरराव भोसिकर, जयसिंग पंडित, रवींद्र देशमुख, राकेश पन्नासे, विनोद ढोणे, दीपक कोरपे, नितीन भेटाळू, जयश्री पाटील, शैलजा लोटके, सिद्धार्थ कांबळे, प्रभारी कार्यकारी संचालक मनोज शिंदे, प्रभारी सरव्यवस्थापक हनुमंत शिरके आदी उपस्थित होते.