Pankaj Bhoyar : अहिल्यानगरमधील परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेऊ नका !

Situation in Ahilyanagar under control; miscreants attempted to disrupt peace in Maharashtra : महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न

Nagpur : अहिल्यानगरमध्ये ‘i love mohammad’ची रांगोळी काढण्यात आली. त्यावरून चांगलाच वाद पेटला. तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ही रांगोळी चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली होती. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळाला. त्यामुळे सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. पण आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि शांतता बाळगावी, असे आवाहन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. काही समाजकंटक महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार व संयमी आहे, अफवांवर विश्वास ठेवणार नाही, टीईटी परीक्षेसंदर्भात ते म्हणाले, २०१० साली केंद्राने आरटीई कायदा आणला. त्यानुसार परीक्षा बंधनकारक करण्यात आली. यामध्ये काही शिक्षक सन २०१३ च्या नंतर लागल्याने ती शिक्षकांना लागू करावी. राज्य सरकारने पुनर्विलोकन याचिका टाकावी, यासाठी शिक्षक संघटनांशी चर्चा करू.

Pankaj Bhoyar : सेवाग्रामच्या नावाने त्यांनी अनेक यात्रा काढल्या, पण..!

भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तालुकानिहाय जनता दरबारांचे आयोजन केले जात आहे. तक्रारी सोडवल्या जात आहेत. निराकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के तक्रारी सोडवल्या आहेत. ३० टक्के तक्रारी प्रलंबित का आहेत, यासाठी आढावा बैठक घेतली आहे, असे राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले. असदुद्दीन ओवेसी यांच्या कोल्हापूर येथील सभेबाबत बोलताना ते म्हणाले, ओवेसीसारखे लोकप्रतिनिधी समाजा-समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत.