Breaking

Parinay Fuke : बहिणी खुश होणार, बेरोजगारी दूर होणार!

 

Amount of Ladki Bhahin scheme will increase : सरकार शब्द राखणार, आमदार परिणय फुकेंना विश्वास

Nagpur सरकारने लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात वचन दिले आहे. हे वचन सरकार मोडणार नाही, याची खात्री देणारा हा अर्थसंकल्प आहे. सरकार दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहे. केवळ २१०० रुपये नव्हे तर लाडकी बहिण योजनेअंतर्गत ३ हजार रुपये देण्यात येतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात आहे. संकल्पपत्रात भाजपने महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यावर्षी हे आश्वासन पूर्ण होणार नाही. परंतु हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असं फुके म्हणाले.

Ladki Bahin Scheme : २२ हजार बहिणी एका क्षणात झाल्या नावडत्या!

येत्या एक वर्षात या आश्वासनाची पूर्तता होणार आहे, असा विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला. संकल्प पत्रात घोषणा या पाच वर्षासाठी असतात. या सर्व आश्वासनांची पूर्तता पुढील पाच वर्षात केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojna : ४० बहिणींकडे कार आहे, तरीही झाल्या ‘लाडक्या’!

राज्यात बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योगांना चालना दिली जाणार आहे. विदेशी गुंतवणूक १५ हजार कोटींची होणार आहे. आज अर्थसंकल्पात ४० लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे म्हटले आहे. यातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. यामुळे भाजप दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते अर्थसंकल्पावर टीका करीत असल्याचे आमदार फुके यांनी म्हटले आहे.