BJP leader criticizes Sharad Pawar and Sushma Andhare : ते फक्त भाजपवर टिका करण्याची संधी शोधत असतात
Nagpur : प्रवीण गायकवाड यांच्यावर ज्याने हल्ला केला, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. या घटनेला राजकीय रंग देण्याचे कुठलेही कारण नाही. ज्या प्रकारे शरद पवार आणि सुषमा अंधारे यांनी टिका केली, ते पाहता असं वाटतंय की त्यांना राजकीय कावीळ झाला आहे. काहीही घडलं तरी त्याच्यामागे भाजपच आहे, असा त्यांचा दृष्टीकोण असतो. भाजपवर टिका करण्याची केवळ संधी ते शोधत असतात. बाकी त्यांना दुसरं काम नाही, असे भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी म्हटले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार आणि सुषमा अंधारे यांनी जी टिका केली, त्यावर आमदार फुके यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. गोंदिया जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष आमचाच होणार. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार आहे. २० पैकी १४ सदस्य आमच्या सोबत आहेत. आणखी एक-दोन सदस्यांशी संपर्क सुरू आहे. १५ ते १६ मते घेऊन अध्यक्ष आमचाच होणार, हे निश्चित आहे. बाकी कुणाला किती आणि कशा अफवा पसरवायच्या ते पसरवू द्या.
Akola administration : ‘५० कोटींचे वॉटर सर्व्हिसिंग सेंटर’; अंडरपास फसला
भारतीय जनता पक्षाचे कामकाज संपूर्ण राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठी विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे इतर पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती पाहिल्या अन् डॉक्टर आणि कम्पाऊंडरची वक्तव्ये पाहिली तर तो एक विनोदी शो वाटतो, असे डॉ. परिणय फुके म्हणाले.