Congress leader Nana Patole should pay attention to the Gram Panchayat : सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा पराभव झाला
Nagpur : बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठी ओरड केली होती. आता जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष द्यावे, राज्याच्या राजकारणात त्यांना स्कोप नाही, अशी जळजळीत टिका भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.
नागपुरात आज (२९ जुलै) आमदार फुके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे बंधुंसंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले, यात काही नवल नाही. त्या लोकांनी जे घोटाळे केले, त्याचे काय? राजकारण करत असताना त्यांनी जनतेसाठी काय केले, हे सांगितले पाहिजे. ठाकरेंकडे अनेक वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी मोठमोठे घोटाळे केले. याचे उत्तर या दोन्ही भावांनी दिले पाहिजे. मुंबईतील मराठी माणसाला मुर्ख बनवण्याचे काम त्यांनी बंद करावे. तसेही यापुढे मुंबई महानगरपालिके महायुतीचा महापौर दिसेल.
Parinay Fuke : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापरावर चाप, परिणय फुकेंच्या लढ्याला यश !
राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो. नेते वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट अधूनमदून होत असते, असे आमदार फुके यांनी सांगितले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेबद्दल विचारले असता, मंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होत नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज यावर काहीही चर्चा नाही, असे डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.








